शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वन्यप्राणी करतात शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST

फोटो गोवरी : वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान केले जाते. शेतकरी शेतात दिवसरात्र मेहनत करून पिकांना जिवापाड जपत ...

फोटो

गोवरी : वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान केले जाते. शेतकरी शेतात दिवसरात्र मेहनत करून पिकांना जिवापाड जपत असतात. परंतु वनविभाग वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी असफल ठरला असून पिकांमध्ये वन्यप्राणी भरदिवसा धिंगाणा घालत असल्याने शेतकºयांच्या हातात येणारे पीक डोळ्यांदेखत प्राणी उदध्वस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी हातात येणारे पीक वन्यप्राणी भरदिवसा डोळ्यांदेखत उदध्वस्त करीत असतात. परंतु वनविभागाने यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यामुळे दरवर्षी वन्यप्राण्यांकडून शेतीचे अतोनात नुकसान केले जाते. वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

सध्या पीक फळधारणेवर आले आहे. सोयाबीन पीक कापणीला आले तर कपाशीला बोंडे लागली आहे. पीक शेतकºयांच्या हातात आले असले तरी अजूनही बहुतांश पीक शेतात आहे. मात्र वन्यप्राणी भरदिवसा शेतात धिंगाणा घालून पीक उदध्वस्त करीत आहे. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी प्रभाकर जुनघरी, बंडूजी बोभाटे,भास्कर जुनघरी,विकास पिंपळकर,श्रीधर जुनघरी,प्रमोद लांडे, सुनील देळवाकर, मंगेश जुनघरी, राजेश्वर कुंचेवार,चेतन बोभाटे,निखिल लांडे,तुषार लोहे, केतन बोभाटे,भूषण जुनघरी व शेतकºयांनी केली आहे.

वेकोलिचे ढिगारे झाले झुडुपी जंगल

राजुरा तालुक्यातील बहुतांश भाग झुडपी जंगलाने व्यापला आहे. सोबतच गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी, वरोडा परिसरात मोठया प्रमाणात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा उत्खननासाठी वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे शेतीच्या परिसरात टाकल्यामुळे या मातीच्या महाकाय ढिगाºयावर झुडपी जंगल तयार झाल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असतो. भरदिवसा वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने हातात येणारे पीक नष्ट होत आहे.

बॉक्स

नुकसान भरपाई नको, बंदोबस्त करा

शेतकरी उसनवारी व कर्ज काढून शेतीवर मोठया प्रमाणात दरवर्षी खर्च करीत असतात. मात्र वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकºयांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नुकसान भरपाई म्हणून शासन शेतकºयांना नाममात्र भरपाई देऊन मोकळे होतात. नुकसान लाखाचे आणि मदत हजारात अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्हाला मदत नको वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, असा केविलवाणा सूर शेतकरीवर्गात उमटायला लागला आहे.