शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

फ्लॅटमध्ये पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा 25 रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच महागाई दररोज वाढत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरातही प्रत्येक महिन्यात वाढ होत आहे. सततची महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. जानेवारी महिन्यात ७५० रुपयांच्या जवळपास असलेला सिलिंडर आता ९३३ रुपयांवर पोहोचला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस सिलिंडर दरवाढीच्या किमतीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. मागील महिन्यांत २५ रुपयांनी सिलिंडरची दरवाढ झाली असताना आता पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर ९३३ रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटायला लागल्या आहेत. परंतु, हिच महागाईची झळ शहरातसुद्धा जाणवत असल्याने घर व फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का? असा संतप्त सवाल गृहिणीकडून विचारल्या जात आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच महागाई दररोज वाढत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरातही प्रत्येक महिन्यात वाढ होत आहे. सततची महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. जानेवारी महिन्यात ७५० रुपयांच्या जवळपास असलेला सिलिंडर आता ९३३ रुपयांवर पोहोचला आहे. 

सबसिडी किती मिळते हो भाऊ- घरामध्ये आता सिलिंडरचा वापर वाढला असून या वर्षात तब्बल २०० रुपयांच्या जवळपास दरवाढ झाली आहे. मात्र, सिलिंडरवर मिळणार सबसिडी दिवसेंदिवस कमी होत आहे. - यंदा जानेवारी महिन्यांपासून ग्राहकांना केवळ ५० रुपयांच्या जवळपास नाममात्र सबसिडी मिळत आहे. बऱ्याच ग्राहकांच्या खात्यात नियमित जमाही होत नसल्याची ओरड आहे. 

व्यावसायिक सिलिंडरही महागघरगुती सिलिंडरसोबतच १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचीही मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याही सिलिंडरच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यांमध्ये १ हजार ७६५ रुपयांत मिळणार सिलिंडर आता १ हजार ८५० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरसुद्धा परवडेनासे झाले आहेत.

महिन्याचे गणितच कोलमडलेपूर्वीच महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच प्रत्येक महिन्यात सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे चूल पेटविल्याशिवाय पर्याय नाही. सततच्या महागाईने घर चालविणे मोठे जिकिरीचे झाले आहे.- प्रतीक्षा बेलसरे, गृहिणी

कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम पडला आहे. त्यातच महागाई पिच्छा सोडण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे घरखर्च करताना मोठी अडचण होत आहे. सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असल्याने अडचण जात आहे.-पुजा राठोड, गृहिणी 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर