शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

व्हाइट कॉलर गुन्हेगार मोकळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध कंपन्या, बँक, पतसंस्थांमध्ये झालेल्या अपहाराच्या २१ गुन्ह्यांचा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास सुरू आहे. ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध कंपन्या, बँक, पतसंस्थांमध्ये झालेल्या अपहाराच्या २१ गुन्ह्यांचा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास सुरू आहे. यातील ६ प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याने कोट्यवधी रुपयांचा अपहार करणारे व्हाइट कॉलर गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत.

आकर्षक व्याजदार, दामदुप्पट असे आमिष दाखवून काही मल्टिनॅशनल कंपन्या, पतसंस्थांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून कोट्यवधींचा चुना लावून गाशा गुंडाळला. बहुतांश पतसंस्थांनीही गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडविले आहेत. याबाबतचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असते. २०१९ मध्ये अशी सात प्रकरणे तर २०२० मध्ये १४ प्रकरणे आर्थिक गुन्हे शाखेकडे आली आहेत. त्यातील सहा प्रकरणांमध्ये दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे. मात्र गुंतवणूकदार व खातेदार आपले अडकलेले पैसे परत मिळतील या आशेने आर्थिक गुन्हे शाखेकडे चकरा मारत आहेत.

बॉक्स

या संस्थांमध्ये झाला अपहार

चंद्रपूर येथील कोल सिटी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मैत्रेय, गायकवाड समितीतर्फे आदिवासी योजनेतील विविध प्रकरणे, स्कॉलर लॅण्ड डेव्हलपर्स, रोज नागरी सहकारी पतसंस्था यासह जिल्ह्यातील अनेक पतसंस्था व संस्थेतील अपहाराचा तपास सुरू आहे.

बॉक्स

सीडीसीसी बँकेतील घोटाळा गाजला

येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील अनुकंपा भरती प्रकरण तसेच साहित्य खरेदी प्रकरणाचा घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजला. बँकेतील संचालकांनी या प्रकरणाची तक्रार केल्याने हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत होते.