शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी करून शेतकरी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

वरोरा : दहा हजार शेतकऱ्यांनी यावर्षी हमीभावाने कापूस विकण्याकरिता नोंदणी केली. आजपर्यंत ३१६६ शेतकऱ्यांनी कापूस विकला. शिल्लक सात ...

वरोरा : दहा हजार शेतकऱ्यांनी यावर्षी हमीभावाने कापूस विकण्याकरिता नोंदणी केली. आजपर्यंत ३१६६ शेतकऱ्यांनी कापूस विकला. शिल्लक सात हजार शेतकऱ्यांशी बाजार समितीच्या वतीने वारंवार संपर्क साधला. तरीही कापूस विक्रीकरिता शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले.

कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोराकडे यावर्षी हमीभावाने कापूस विक्रीकरिता दहा हजार ३०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील तीन हजार १६२ शेतकऱ्यांनी हमीभावाने ७५ हजार २०१ क्विंटल कापूस विकला, तर काही शेतकऱ्यांनी थेट जिनिंगमध्ये दोन लाख १२ हजार क्विंटल विकला. सात हजार १४७ शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हमीभावाने कापूस विकला नसल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीच्या वतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी वारंवार संपर्क केला जात आहे. परंतु शेतकरी प्रतिसाद देत नसल्याचे प्रथमच आढळून आले आहे.

बॉक्स

कापूस बाजारपेठेवर निवडणुकीचे सावट

नुकतीच ग्रामपंचायतीची निवडणूक आटोपली. निवडणूक सुरू असताना ग्रामीण भागातील नागरिकांनी शेतातील कामे बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीत व्यस्तता दाखवली. त्याचा परिणामही असा झाला की, कापूस वेचता आला नाही. कापूस तसाच शेतात आहे. आता निवडणुका झाल्याने शेतकरी कापूस विकायला आणतील, असे मानले जात आहे.

बॉक्स

कापसावर बोंड अळीचे आक्रमण

कापसाची दोन ते तीन वेळा वेचणी झाल्यानंतर बोंड अळीने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात नांगर फिरवला. कपाशीला बोंडे आहेत. परंतु ते फुटत नाहीत. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट झाल्याचे मानले जात आहे.