शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांना खावटी योजनेचा लाभ केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील देवाडा व परिसरात बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी पेसामध्ये येतात. आदिवासी बांधवांसाठी खावटी वाटप ...

देवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील देवाडा व परिसरात बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी पेसामध्ये येतात. आदिवासी बांधवांसाठी खावटी वाटप योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेचा अनुदानाचा पहिला हप्ता दोन हजार रुपये थेट आदिवासी बांधवांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. कोरोना संकटात दिलासा मिळावा, यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार असल्याचा उल्लेख या शासन निर्णयात होता. मात्र दहा महिने लोटूनही याबाबतची निविदाच शासनाने काढली नसल्याचा रोष आदिवासी जनतेकडून व्यक्त केला जात आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आदिवासी बांधवांच्या हाताला काम नाही. मागील वर्षांपासून कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक भयभीत असल्याने गाव सोडून दुसऱ्या गावाला कामासाठी जाण्यासाठी घाबरत आहेत. देवाडा परिसरात कोणतेही लहान मोठे उद्योग वा कंपन्या नसल्यामुळे त्यांना शेतीच्या मजुरीच्या भरवशावरच आपले पोट भरावे लागते, मजुरी दररोज मिळत नसल्याने कधी उपाशीपोटी राहावे लागते. किराणा व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात याव्या, याकडे आदिवासी विकास विभाग व शासन, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.