शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटांचे लिलाव केव्हा होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:30 IST

जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.

ठळक मुद्देअंदाजपत्रकेही धूळ खात: विकासकामे करायची कशी?

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.बांधकामासाठी अत्यंत आवश्यक असणारी रेती मिळत नसल्याने कामे करण्यास कंत्राटदारही पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात वैनगंगा नदीलगतच असलेल्या राजुरा, कोरपना, बल्लारशाह तालुक्यात अनेक मोठी रेतीघाटे आहेत. सदर घाटावरुन नेहमीच रेतीचा पुरवठा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होतो. यातच यावर्षी पावसाच्या पुराने सदर रेतीघाटांवर रेतीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रियेतून रेतीघाटांचा लिलाव बंद पडला असून आज ना उद्या येईल, या प्रतीक्षेत ग्राहक दिसत आहे.याचाच फायदा घेत आता रेती तस्करीला उधाण आले आहे. अनेक रेती तस्कर रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात करीत आहे. याबाबत अनेकदा स्थानिक तहसीलदारांकडून कारवाई झाली खरी. परंतु छुप्या मार्गाने सदर अवैध वाहतूक सुरुच आहे. अनेक ग्रामपंचायती तसेच नगर परिषदांना लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कामाचे आराखडे तयार असून प्रलंबित अंदाजपत्रकेसुद्धा प्राप्त झाली. मात्र कामाच्या तोंडावर रेतीचे ग्रहण विकास कामांना लागत असल्याची बाब आता सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व नेते कमालीचे त्रस्त आहे. रेतीघाट लिलावाची प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने विलंब लागणार आहे.विकासकामात अडचणीग्रामपंचायतीमार्फत कामे करताना अनेक ग्रामपंचायती नजिकच्या रेतीघाटावरुन काळी रेती आणून कामे करीत आहे. मात्र रेतीघाटाची परवानगी नलस्याने तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहे. एकीकडे गावात कामे होत नसल्याची जनतेची बोंब असताना दुसरीकडे रेतीच मिळत नसल्याने कामे करायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.