शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

चहासाठी रेल्वे थांबते तेव्हा...

By admin | Updated: May 8, 2016 00:48 IST

ताडाळी - घुग्घुस - एसीसी कंपनीकडे खाली वॅगन घेऊन जात असताना स्थानिक पोलीस ठाण्याजवळच्या रेल्वे गेटवर चक्क रेल्वे थांबवून रेल्वे कर्मचारी चहा पित होते.

घुग्घुस : ताडाळी - घुग्घुस - एसीसी कंपनीकडे खाली वॅगन घेऊन जात असताना स्थानिक पोलीस ठाण्याजवळच्या रेल्वे गेटवर चक्क रेल्वे थांबवून रेल्वे कर्मचारी चहा पित होते. कर्मचाऱ्यांच्या या प्रतापामुळे गेटवर वाहतुकीची कोंडी झाली. हा संतापजनक प्रकार शनिवारी सकाळी उजेडात आला. घुग्घुस गावाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसभर मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर ताडाळी -घुग्घुस व पुढे एसीसीपर्यत रेल्वे लाईन असून सिमेंटची रेल्वेनेच वाहतूक केली जाते. पोलीस ठाण्यानजिक रेल्वे गेट आहे. दिवसातून अनेकदा रेल्वेतून सिमेंटची वाहतूक होत असते. यादरम्यान गेट बंद असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने वाहनचालक नेहमीच त्रस्त असतात. त्याचा फटका रूग्णवाहिकेलाही अनेकदा बसतो. शाळकरी मुलांना शाळेच्या वेळेवर पोहचता येत नाही. आज शनिवारी सकाळी सात-सव्वासातच्या दरम्यान ताडाळीकडून सुमारे ५०-६० रेल्वे वॅगन घेऊन एसीसी कंपनीत जात असलेल्या रेल्वे गाडी चालकाने पोलीस ठाण्यानजिकच्या रेल्वे गेटवर रेल्वे उभी चहा पिण्यासाठी गेला. या प्रकारामुळे त्या गेटवर बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, वाहनधारकांनी आक्रोश केला. त्यानंतर या चालकाने तिथून रेल्वे पुढे नेली. (वार्ताहर)