शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या स्थलांतरामुळे आठवडी बाजारावर अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST

राजोली : या परिसरातील शेकडो मजुराचे जत्थे मिळेल त्या वाहनाने नजीकच्या ...

राजोली : या परिसरातील शेकडो मजुराचे जत्थे मिळेल त्या वाहनाने नजीकच्या तेलंगणा आणि आध्रप्रदेश येथे मिरची व कापूस वेचणीच्या कामाकरिता गेले. गावे, पाडे, वस्त्या ओस पडल्या आहेत. यावर्षी प्रथमच शाळकरी मुलामुलीसह कुटुंब घेऊन शेकडो शेतकरी व शेतमजूर कामाच्या शोधात स्थलांतरित झाले. त्यामुळे आठवडी बाजार आणि गावखेड्यातील लहान मोठया व्यवसायावर अवकळा पसरली आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात लहान मोठे सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. त्यामुळे नागरिकाना मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण सहन करावा लागला होता. परंतु लवकरच शेती हंगाम सुरू झाला आणि मजुरांना शेतीच्या मशागतीसोबत धान रोवणी ते कापणीपर्यंतची कामे मिळाल्याने गाव खेड्यातील अर्थव्यवस्थेला काहीशी चालना मिळाली होती. परंतु हवामान बदलामुळे धानपिकाच्या उत्पादनात निम्यापेक्षाही अधिक घट झाली. परिणामी रुळावर आलेल्या गावखेड्यातील अर्थव्यवस्थेला पुन्हा ब्रेक लागला.

परिसरात शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन किंवा उद्योग नाही. त्यामुळे या परिसरातील मजुरांना शेतीचा हंगाम संपल्यानंतर नेहमीच कामाच्या शोधार्थ भटकंती करावी लागते.परंतु यावर्षी शेतीने दगा दिल्यामुळे मजूरवर्ग व अल्पभूधारक शेतकरीहीं कामाच्या शोधार्थ आंध्रप्रदेश व तेलंगणात मिरची व कापूस वेचणीकरिता मोठ्या प्रमाणावर ट्रक, ट्रॅव्हलसारख्या वाहनाने स्थलांतरित झाले आहेत. परिणामी परिसरातील सर्वच गावे आता ओस दिसू लागली असून गावखेड्यातील दुकान व किरकोळ व्यवसाय ग्राहकाअभावी बंद पडल्याचे चित्र आहे. तर विविध वस्तुंनी सजलेल्या व नेहमी ग्राहकाच्या गर्दीने फुललेल्या आठवडी बाजारावर अवकळा पसरली आहे .जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीकरिता गर्दी करणारे ग्राहक बाजारात दिसेनासे झाले असून विक्रेत्यांना ग्राहकाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.