शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराची मागणी

By admin | Updated: May 8, 2016 00:47 IST

नागभीड ते देलनवाडी रस्त्याने नागभीड शहर विस्तारले जात आहे. या भागात अनेक नवीन वसाहती निर्माण होत असून हळूहळू विकसित होत आहे.

दोन कि.मी. अंतराची पायपीट थांबेलब्रह्मपुरी : नागभीड ते देलनवाडी रस्त्याने नागभीड शहर विस्तारले जात आहे. या भागात अनेक नवीन वसाहती निर्माण होत असून हळूहळू विकसित होत आहे. मात्र भाजीपाला, किराणा, कापड व अन्य साहित्य खरेदीसाठी नागरिकांना एक ते दोन किलोमीटर अंतरावर जावे लागते. नगरपालिका प्रशासनाने शुक्रवार वगळता एक दिवस येथे आठवडी बाजार भरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पूर्वी ब्रह्मपुरीकडे भवानी देवस्थानाजवळ मंगळवारी भरणारी गुजरी प्रसिद्ध होती. कालांतराने ती बंद झाली. परंतु शुक्रवार बाजार तेथील नागरिकांना जवळ असल्याने गुजरीची उणीव भासली नाही. परंतु सध्या देलनवाडी वॉर्डात देलनवाडी, श्रीनगर, शेषनगर, आनंदनगर, पटवारी कॉलनी, शांतीनगर, विद्युत कॉलनी, गुरुदेव नगर, शिक्षक कॉलनी अशा वसाहती झाल्या आहेत. या परिसरात बहुतांश कुटुंब प्रमुख आजुबाजूला ५० ते १०० कि.मी.चा प्रवास नोकरीनिमित्ताने करीत असतात. काही कुटुंबप्रमुख शनिवार व रविवालाच कुटुंबासोबत राहत असतात. अशा बहुतांश कुटुंबामध्ये महिला वर्ग व लहान मुले वास्तव्यास राहत असताना मुख्य बाजारात किंवा आठवडी बाजारात जाण्यासाठी एक ते दोन कि.मी. प्रवास करुन जावे लागत असते. यासाठी महिलावर्गाची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असते. अनेकदा बाजारात जाताना रिक्षा मिळत नसल्याचाही अनुभव आल्याने मुख्य बाजार व बाजारपेठ सहज व सोपे राहिले नाही. नागभीड रोडवर वेगाने धावणारी वाहने यामुळेही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आठवड्यातून शुक्रवार वगळून कोणत्याही दिवशी गुजरी भरविण्याची मागणी केली जात आहे. राखीव जागेत भरवा बाजारनगरपालिकेने या नवीन लेआऊटमध्ये अनेक क्षेत्र राखीव ठेवले आहे. त्यापैकी रस्त्यालगत आनंदनगराला लागून असलेले राखीव क्षेत्र बाजारासाठी ठेवले आहे. त्याठिकाणी गुजरी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.वेगावर नियंत्रण आणाख्रिस्तानंद चौक ते देलनवाडीपर्यंत वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवण्याचे कडक धोरण अवलंबविण्याची मागणी अनेक महिलावर्गाकडून केली जात आहे. पोलीस प्रशासनाने भरधाव वेगाने चालविण्याऱ्या दुचाकी व चारचाकीधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.