शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरूद्ध जिल्हाभरात आजपासून ‘विकेंड लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

‘विकेंड लॉकडाऊन’ कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची ...

‘विकेंड लॉकडाऊन’ कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस चिंतेत भर घालणारी ठरत आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम स्वीकारली. या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी ५ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. अंमलबजावणीसाठी चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

असा असेल ‘विकेंड लॉकडाऊन’

सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत, ५ पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरणे वा जमा होण्यास प्रतिबंध आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजतापर्यंत विनाकारण फिरण्यास मनाई आहे.

आजपासून ऑटो रिक्षांवर निर्बंध

ऑटो रिक्षामध्ये चालक अधिक २ प्रवासी, टॅक्सी चारचाकी वाहन - चालक वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के किंवा आरटीओ नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतकेच प्रवासी नेण्यास परवानगी आहे. लसीकरण पूर्ण होईपर्यंत १५ दिवसांसाठी वैध असलेले कोरोना चाचणी प्रमाणपत्र स्वत:जवळ ठेवावे लागणार असल्याने ऑटोचालक अडचणीत येणार आहेत.

खासगी वाहतूक रात्री आठपर्यंतच

खासगी वाहने व बस सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू राहतील. मात्र, अत्यावश्यक सेवा व निकडीच्या वेळी उर्वरित कालावधीसाठी परवानगी आहे. या चालकांनाही लसीकरण किंवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्टचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

दोन दिवस फक्त घरपोच पार्सल सेवा

हॉटेलच्या आवारातील रेस्टॉरंटवगळता सर्व रेस्टॉरंट बंद राहतील. शनिवार व रविवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू राहील. सेवा देणाऱ्या कामगारांनी लसीकरण व निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर एक हजार दंड व आस्थापनेवर १० हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

ऑक्सिजन ग्राहकांसाठी नवी अट

सर्व औद्योगिक आस्थापनांना आजपासून ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. प्राधिकाऱ्याकडून पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सर्व ऑक्सिजन उत्पादकांना उत्पादनापैकी ८० टक्के ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषधनिर्माणासाठी राखीव ठेवावा लागणार आहे.

काय बंद काय सुरू राहणार?

रुग्णालये, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, औषध दुकाने, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, टॅक्सी, ऑटो रिक्षा, माल वाहतूक, शेतीसंबंधित सेवा, वृत्तपत्र आदी आवश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

बंदोबस्तासाठी २१०० पोलीस तैनात

जिल्ह्यात बंदोबस्तासाठी १६० अधिकारी, दोन हजार १०० पोलीस आणि ३५० गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.