मागील काही दिवसांमध्ये कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले; मात्र महत्त्वाचे काम असेल तर घराबाहेर पडावेच लागते. अशावेळी योग्य प्रकारे मास्क लावून घराबाहेर पडल्यास स्वत:सह इतरांना या आजारापासून सुरक्षित ठेवता येते; मात्र त्यासाठी स्वत: काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मागील काही दिवसांमध्ये नागरिक डबल मास्क लावण्यावर भर देत आहे; मात्र काही जण मास्क लावून तो हनुवटीवर ठेवतात. तर अनेक जण मास्कला वारंवार स्पर्श करतात. यामुळे संसर्ग अधिक होण्याची भीती डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. मास्क लावताना तोंड, नाक पूर्णपणे झाकले जाणे आवश्यक आहे. सोबतच नाकाला वारंवार हात लावणे टाळले पाहिजे. काही जण मास्क लावला असतानाही कोरोना संसर्ग झाल्याचे सांगतात; मात्र ते योग्य प्रकारे मास्कचा वापरच करीत नसल्याचे दिसून येत आहे. बोलताना वारंवार मास्कला खालीवर करण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण केवळ कारवाई टाळण्यासाठी मानेभोवती मास्क लावतात. हे करून आपण स्वत:लाच फसवित आहो. असे न करता मास्क व्यवस्थित लावून स्वत:सह इतरांचे आरोग्य जपा, एक नाही तर डबल मास्क लावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
बाॅक्स
मास्क कसा वापरावा
मास्क लावताना तो नाक आणि तोंड झाकले जाईल, अशा पद्धतीने वापरावा, हनुवटीखालून, नाकाच्या वरच्या भागातून हवा आतमध्ये येणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी मास्क घट्ट बांधावा. कापडी मास्क दररोज स्वच्छ धुवावा.
बाॅक्स
हे करा
आपल्यासमोर कोणतीही व्यक्ती आली तर आधी मास्क घालून नाक व तोंड सुरक्षित करा.
घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क लावा.
सर्जिकल मास्क एकदा वापरून त्याची योग्य विल्हेवाट लावा.
फेसशिल्ड आणि मास्क वापरला तरी पुरेसे आहे.
चांगला दर्जा तसेच स्वच्छ मास्क वापरण्यास प्राधान्य द्या
बाॅक्स
हे करू नये
एकच मास्क न धुता अनेक दिवस वारंवार वापरू नका, बाहेरून घरी आल्यानंतर काही जण मास्कची घडी घालून खिशात ठेवतात आणि बाहेर पडताना पुन्हा तोच मास्क वापरतात. असे करू नका.
मास्क हनुवटीखाली, मानेखाली आणून परत लावणे टाळा.
मास्कच्या बाहेरील अथवा आतील भागाला स्पर्श करू नका.
सर्जिकल किंवा कोणतेही मास्क रस्त्यावर किंवा इतरत्र कुठेही फेकू नका.
मास्क तोंडावर लावण्याऐवजी हनुवटीवर ठेवतात. कानावर अडकवतात. तोंडावरून काढून गळ्याभोवती घेतात, हे अत्यंत चुकीचे आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील एकूण रुग्ण -
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण-
उपचार घेत असलेले रुग्ण-
बाॅक्स
डाॅक्टर काय म्हणतात...
सध्या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. साधा कापडी मास्क लावला तरी संरक्षण मिळते; पण जो मास्क वापरता तो योग्य पद्धतीने वापरायला हवा. मास्कच्या बाहेरील आणि आतील बाजूस वारंवार हात लावू नये. मास्क हनुवटीवर काढून काही जण बोलतात, हे करणे अत्यंत चुकीचे आहे. डबल मास्क लावल्यास अधिक फायदाच होईल.
-डाॅ. सौरभ राजुरकर
छातीरोग तज्ज्ञ, चंद्रपूर.
---
कोरोना रुग्ण असो किंवा नसो, सर्वांनी मास्क लावणे अत्यावश्यक आहे. कापडी मास्क लावले तरी चालेल. विशेषत: कोरोना रुग्ण असेल तर एन-१९ मास्क लावला तर आणखीच फायदा होईल. कोरोनातून बरे झाले म्हणून मास्क लावणे टाळू नये. मास्कमुळे बाहेरील धूळपासूनही संरक्षण होते.त्यामुळे डबल मास्क वापरून आरोग्य जपणे गरजेचेे आहे.
-डाॅ. मनीष मुंधडा
कान, नाक, घसा तज्ज्ञ, चंद्रपूर.