शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही दंड भरणार पण, मास्क नाही लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्हयाच्या शेजारी असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्हयामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने लाॅकडाऊन सुरु केला आहे. दरम्यान, चंदपूर जिल्हयातही मागील काही दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे सुरु केले आहे. कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी लावण्यात आलेले नियम तोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

ठळक मुद्दे५ हजार ७९४ नागिरकांवर कारवाई : १३ लाखांवर केला दंड वसुल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणू आपले पायेमुळे घट्ट रोवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रादूर्भाव रोखण्यासाठी सक्त पाऊल उलचले सुरु केले असून विविध पथकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी होण्याऱ्या गर्दीवर तसेच मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु केला आहे. या अंतर्गत मागील सात दिवसांमध्ये ५ हजार ७९४ नागरिकांकडून तब्बल १३ लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्हयाच्या शेजारी असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्हयामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने लाॅकडाऊन सुरु केला आहे. दरम्यान, चंदपूर जिल्हयातही मागील काही दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे सुरु केले आहे. कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी लावण्यात आलेले नियम तोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, काही नागरिक आजही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांना वठणीवर आणण्यासाठी दंड वसुल सुरु केला आहे. मागील सात दिवसामध्ये जिमखाना, क्लब, मंगल कार्यालय, रेस्टाॅरंट, सिनेमा गृह, माल्स,बाग, तसेच सार्वजनिक ठिकाण अशा तब्बल २ हजार ३५४ ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. यामध्ये ८४ ठिकाणी नियम पाळला जात नसल्याचे आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करीत १ लाख ७४ हजार १०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. तर बाजार तसेच इतर ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्या ५ हजार ७९४ नागरिकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १३ लाख ३९ हजार ७०० रुपये वसुल केले आहे.

कोरोना संकट अद्याप गेले नाही. प्रादूर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण फिरू नये, मास्क लावावे, नियम पाळावे, अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडावे. लक्षणे आढळून आल्यास जवळच्या रुग्णालयात जावून कोरोनाची तपासणी करून घ्यावी.- मनोहर गव्हाळ, निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या