शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वेकोलिच्या माती ढिगाऱ्याने पुराचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:59 IST

बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, सास्ती, गोवरी, नांदगाव, मानाटेकडी गावांना पुराचा धोका उद्भवणार आहे.

ठळक मुद्देबल्लारपूर, सास्ती, गोवरीला धोका : शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, सास्ती, गोवरी, नांदगाव, मानाटेकडी गावांना पुराचा धोका उद्भवणार आहे.मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन हे राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी केले आहे. बल्लारपूर शहराला लागून असलेल्या वर्धा नदीवर गोवरी, सास्ती, पोवनी या भागातील नाल्याच्या किनारी ओव्हरबर्डन उभे केले आहे. यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण होवून काही ठिकाणी प्रवाह वळता केला आहे. यामुळे पावसाच्या दिवसात मातीच्या ढिगाºयामुळे पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा या परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसते. यामुळे क्षणार्धात पूरपरिस्थिती निर्माण होवून नागरिकांना भयावह संकटाचा सामना करावा लागतो.पुरामुळे अनेक संसार उघड्यावर येत असल्याने दरवर्षी प्रकल्पग्रस्त गावकरी उघड्या डोळ्यांनी बघत असतात. मागील आठवड्यात आलेल्या एका पावसाने या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. वेकोलिने नैसर्गिक जीवंत नाले आपल्या सोयीनुसार वळविल्याने पावसाळ्यात पाणी गोवरी, सास्ती, पोवणी गावाच्या दिशेने लवकर फेकल्या जाते. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती क्षणार्धात पाण्याखाली येवून शेतपिकांचे प्रचंड नुकसान होते. त्याचा फटका बल्लारपूर शहरालाही व शेतपिकांना बसतो.नदी व नाल्याच्या काठावर असलेले ओव्हरबर्डन हटविणे व संरक्षक भिंत बांधणे, यावर जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली होती. वेकोलिला ओव्हरबर्डन हटविण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस महाकाय ढिगारे कायम असून त्यात वाढच होत आहे. निरीच्या चमूने वेकोलिच्या ढिगाºयामुळे पुरस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर बल्लारपूर क्षेत्रातील नदीचा गाळ उपसा करून काठावरील ढिगारे हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पावसाळा तोंडावर आला तरीही वेकोलिने मातीचे ढिगारे जैसे थे ठेवल्याने बल्लारपूर क्षेत्रातील गावांना पूराचा धोका कायम आहे.