शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा बंदच्या मार्गावर

By admin | Updated: June 14, 2014 01:54 IST

काही दिवसापूर्वी खेड्यापाड्यात केवळ मराठी माध्यम असलेल्या शाळा होत्या.

देवाडा (खुर्द) : काही दिवसापूर्वी खेड्यापाड्यात केवळ मराठी माध्यम असलेल्या शाळा होत्या. आता मात्र गावागावांत कॉन्व्हेंट संस्कृती आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा कल इंग्रजीकडे वळत असल्याने मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात गावागावांत फिरत आहे.जिल्हा परिषद आणि खासगी संस्थांनी पाचवी ते दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळा गावोगावी सुरू केल्या. या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी व पालकांना बरीच कसरत करावी लागत होती. परंतु आता हे चित्र मात्र उलट झाले आहे. प्रत्येक मराठी माध्यम असलेल्या शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दारोदारी फिरत आहेत. प्रतिस्पर्धी मराठी शाळेपेक्षा आपली शाळा कशी चांगली आहे, हे पालकांना पटवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. तरीही त्यांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचा इंग्रजीकडे वाढलेला कल त्यासाठी कारणीभूत ठरत आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना सुद्धा शासनमान्य खासगी शाळेचे शिक्षक गावागावात विद्यार्थी मिळविण्याकरिता भटकत आहेत. त्यांना आपल्या शाळेतील संबंधित वर्ग तुकडी वाचविणे, विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. इंग्रजी माध्यमाने त्यांच्यापुढे हे मोठे आव्हान उभे केले आहे. प्रत्येक पाल्य मात्र आपल्या पाल्याचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घ्यावे यासाठीच आग्रही दिसून येत आहे. काही इंग्रजी शाळा विद्यार्थी व पालकांना विविध प्रलोभनेही दाखवित आहे. मराठी माध्यमांच्या शाळांकडे सध्या विद्यार्थी व पालकांनी पाठ फिरविली आहे. परिणामी मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्तीत्त्व टिकविण्यासाठी संस्था चालक व शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागत आहे. शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्याकरिता विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागत आहे.इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत असल्याने मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक काळात इंग्रजीचे शिक्षण अत्यंत गरजेचे असले तरी, मातृभाषेतील शिक्षणाला जपणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी इंग्रजीसोबत मराठीलाही महत्त्व देणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)