शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट सचिव मानधनापासून वंचित

By admin | Updated: March 5, 2016 00:58 IST

गावामध्ये पाणलोट विकास पथकाचे तांत्रिक सहकार्याने पाणलोट प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या ...

वडाळा (तु) : गावामध्ये पाणलोट विकास पथकाचे तांत्रिक सहकार्याने पाणलोट प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे मासिक मानधनावर ग्रामसभेने समिती सचिवाची निवड करून प्रकल्पाचे काम सुरू केले. मात्र गेल्या ११ महिन्यांपासून भद्रावती व वरोरा तालुक्यातील पाणलोट सचिव मानधन व प्रवास भत्याच्या रकमेपासून वंचित आहेत. यासंदर्भात भद्रावती तालुक्यातील सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.भद्रावती तालुक्यातील वडाळा (तु), विलोडा, कोकेवाडा (मा), काटवल (भ), काटवल (तु), आष्टा, टेकाडी (दि) व कोकेवाडा (मु) या आठ गावांत २०११ पासून पाच वर्षांसाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (आयडब्ल्यूएमपी) मान्यता मिळवून प्रकल्प सुरू केला. गावामध्ये पाणलोट विकास पथकाचे तांत्रिक सहकार्याने पाणलोट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग हा केंद्रबिंदू मानून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामसभेने पाणलोट समिती स्थापन करून मासिक मानधन तत्वावर समितीच्या सचिवाची निवड करून प्रकल्प राबविण्याला सुरूवात केली. प्रकल्प मंजुरीपासून पाणलोट सचिवांना शासनाचे निर्देशाप्रमाणे ३००० रुपये मासिक मानधन म्हणून मार्च २०१५ पर्यंत नियमित देण्यात आले. मात्र एप्रिल २०१५ पासून सचिवांना आजपर्यंतचे मानधन व प्रवास भत्याची रक्कम अजुनपर्यंत देण्यात आली नाही. सदर रक्कम तातडीने देण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)