शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: July 24, 2015 01:00 IST

येथील तुकूम परिसराजवळील आसोला मेंढा नहराला लागून असलेली पाईप लाईन फुटल्याने सावली शहरातील पाणी पुरवठा बंद आहे.

पाण्याची चोरी : कारवाईची मागणीसावली: येथील तुकूम परिसराजवळील आसोला मेंढा नहराला लागून असलेली पाईप लाईन फुटल्याने सावली शहरातील पाणी पुरवठा बंद आहे.पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने अशुद्ध विहिरीच्या पाण्यावर सावलीकरांना तहान भागवावी लागत आहे. परिणामी नागरिकांना जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.१७ जूनला ग्रामपंचायतीचे अधिकार गोठवून सावलीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला. या नगरपंचायतीचा कारभार सध्या तहसीलदार वंदना सौरंगपते काम पाहत आहेत. तालुक्यात ग्रामंपचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यामुळे तहसीलदार निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. या संधीचा फायदा घेवून काही शेतकरी जलवाहिनी फोडून शेतीला सिंचन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. येथे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना असाच प्रकार काही शेतकऱ्यांनी केला होता. मात्र त्यांच्यावर सरपंचाकडून कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे पाण्याची चोरी शेतकरी निर्भिडपणे करीत आहेत.प्रशासन कामात मग्न आहेत. ही संधी साधून शेतकऱ्यांनी पाईपलाईन फोडून पाणी चोरण्याचा मार्ग निवडला आहे. पाईपलाईन फुटल्याने पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचत नाही. गावात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. येथे नेहमीच नळाला कमी पाणी पुरवठा होतो. अशुद्ध पाण्याचा वापर जनता करीत आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवू होऊ शकतो.सार्वजनिक विहिरीजवळ घराशेजारील लोकांनी अतिक्रमण केले आहे. सांडपाणी याच विहिरीजवळून वाहत असल्याने विहीरीतील पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. पाईप लाईन फोडणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करावी व दुरुस्तीकरिता आलेल्या खर्चाची भरपाई त्या शेतकऱ्यांकडून घ्यावी अशी मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)