शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मूल, पोंभुर्णा, बल्‍लारपूर तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्‍यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे मूल तालुक्‍यातील २४ गावे, पोंभुर्णा तालुक्‍यातील १५ ...

चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे मूल तालुक्‍यातील २४ गावे, पोंभुर्णा तालुक्‍यातील १५ गावे, तर बल्‍लारपूर तालुक्‍यातील १८ गावे अंतर्भूत असलेल्‍या योजनेचा विस्‍तृत आढावा घेतला. याप्रसंगी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, महिला व बालकल्‍याण सभापती रोशनी खान, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, ॲड. हरीश गेडाम, वैशाली बुद्धलवार, गौतम निमगडे, रामपाल सिंह, पं.स. पोंभुर्णाच्‍या सभापती अल्का आत्राम, पं.स. सभापती केमा रायपुरे, रमेश पिपरे, नामदेव आसुटकर, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा (जि.प.) व अन्‍य अधिकारी उपस्थित होते.

संबंधित योजनांच्या कामांची प्रशासकीय मान्‍यता कधी मिळाली, त्याची किंमत किती, टेंडर कधी झाले, काम पूर्ण करण्‍याचा कालावधी किती होता, त्‍याला उशीर झाला असल्‍यास काही दंड ठोठावला का, व तो वसूल झाला का, असे अनेक प्रश्‍नांचा आढावा घेतला. मूल तालुक्‍यातील सार्वजनिक ठिकाणी ऑक्‍टोबर २०२१ पर्यंत, पोंभुर्णा तालुक्‍यातील काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्‍याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही, असे बजावत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.