शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हस्तांतरणात अडकला चार गावांचा पाणीपुरवठा

By admin | Updated: April 16, 2016 00:39 IST

सूर्य आग ओकत असल्याने जीवाची लाही लाही होत आहे. पारा वाढल्याने जमीनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने चिमूर नगर परिषद हद्दीतील...

नगर परिषदेनंतरही समस्या सुटेना : वडगाव येथील प्रभाग १ व ३ मध्ये दिवसाआड पाणीपुरवठाचिमूर : सूर्य आग ओकत असल्याने जीवाची लाही लाही होत आहे. पारा वाढल्याने जमीनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने चिमूर नगर परिषद हद्दीतील गावात पाण्याचे संकट उग्र रूप धारण करू लागले आहे. या संकटावर मात करण्याच्या दृष्टीन ग्रामपंचायत असताना ग्रामीण पाीण पुरवठा विभागामार्फत वडाळा, शेडेगाव, सोनेगाव व काग गावात विस्तारीत नवीन नळ योजनेचे कामे करण्यात आले. मात्र १ मे २०१५ ला चिमूर नगर परिषद अस्तीत्वात आल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत असलेले कामे बंद केली. ही योजना नगर परिषदेकडे अजून हस्तांतरित न झाल्याने या गावातील नळयोजना रखडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.चिमूर शहरापासून हाकेवर असलेल्या वडाळा, शेडेगाव, सोनेगाव व काग गावात ग्रामपंचायत अस्तीत्वात असताना ग्रामीण पाणीे पुरवठा विभागाच्या मार्फत नळ योजना मंजूर करण्यात आल्या. त्यामध्ये वडाळा (पैकु) येथील नळ योजनेची पाईप लाईन टाकायची आहे. तर पंप हाऊस तयार झाले नाही. शेडेगावात पंपहाऊसचे काम करणे बाकी आहे. सोनेगाव (खियम) येथील काम पूर्ण झाले असून हस्तांतरण करण्यात आले नाही. तसेच काग गावात नवीन नळ योजनेचे काम मंजूर करण्यात आले. मात्र जागे अभावी काम न केल्याने पूर्ण निधीच परत गेला आहे. या चारही गावाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात असतानाच चिमूर नगर परिषदेची अधिसुचना जाहीर करण्यात आली. अधीसुचनेमुळे या चारही गावातील नळ योजनेचे काम रखडले आहे. नगर परिषद व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (जिल्हा परिषद) या वेगवेगळ्या असल्याने कामे करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जोपर्यंत नगर परिषदेला योजना हस्तांतरीत करीत नाही, तोपर्यंत या चार गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही.चिमूर शहराची लोकसंख्या नगर परिषदेचा दर्जा देण्याइतकी नसल्याने वडाळा, सोनेगाव, शेडेगाव, काग, पिंपळनेरी, खरकाडा अशा गावांना नगर परिषदेत सामावून घेण्यात आले. या गावांना नगर परिषदेत सामावल्याने त्या गावांची ग्रामपंचायत बरखास्त करण्यात येवून या पाचशे ते दोन हजार लोकसंखेच्या गावांना नागरी दर्जा देण्यात आला. मात्र नागरी दर्जा मिळाल्यानंतर आपली कामे, अनेक योजना लवकर मिळतील अशी आशा बाळगलेल्या नागरिकांचा सध्यातरी भ्रमनिराश झाला आहे. वडाळा, शेडेगाव, सोनेगाव व काग या चार गावाच्या नळयोजनेचे शेवटच्या टप्याचे काम सुरू असतानाच नगर परिषद झाल्याने शासनाने पूर्ण आर्थिक व्यवहार गोठवून पूर्ण ग्रामपंचायतचे रेकार्ड जमा केले. त्यामुळे या गावातील नळ योजना रखडल्या आहेत. त्यामुळे कडक उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा या गावात जाणवत आहेत. वडाळा (पैकू) मध्ये तर विहिरीने तळ गाठला आहे तर नळाला एक दिवसा आड पाणी येत आहे. त्यामुळे नगर परिषद होवूनही समस्या सुटेना, अशी म्हणण्याची वेळ या गावातील नागरिकांवर आली आहे. (वार्ताहर)