लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : रस्त्यावर पडलेला खड्डा बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रपट्यातील पाणी निघण्याचा पाईप पूर्णत: बंद केल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने खड्डा बुजविण्यासाठी चक्क टिनपत्रे लावल्याने पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु)-वनोजा फाटा मार्गावर रस्त्याच्या मधोमध छोट्या रपट्यावर मोठा खड्डा पडला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डा बुजविण्यासाठी चक्क रपट्यामधील सिमेंट काँक्रीटचा गोल पाईप पूर्णत: बंद करून शेतातील पाणी निघण्याचा मार्गच बंद केला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अन्यायग्रस्त शेतकऱ्याने विचारणा केली असता त्यांनी शेतकºयाला उडवाउडवीची उत्तरे दिली. खड्डा बुजविण्यासाठी रपट्यातील लोखंडी टिनपत्र्याचा वापर करण्यात आला आहे. टिनपत्र्याचा वापर केल्याने वाहनांच्या वजनाने केव्हाही या ठिकाणी मोठा खड्डा पडून मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.शेतातील पावसाचे पाणी निघण्यासाठी रस्त्यावर छोटा रपटा बांधून त्यात सिमेंटचे गोल पाईप टाकण्यात आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अंतरगाव (बु) - वनोजा फाटा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा बुजविण्यासाठी चक्क रपट्यातील पाईप पूर्णत: बुजवून टाकला. त्यामुळे शेतातील पाणी निघण्याचा मार्गच बंद झाल्यामुळे पावसाच्या पडणाºया पाण्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.खड्डा बुजविण्यासाठी इतर उपाययोजना न करता पाणी निघण्याचा पाईप बुजविण्याचा शहानपणा सार्वजनिक बांधकाम विभागाला कुणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतीचे नुकसान झाल्यास संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बांधकाम विभागाने रपट्यातील गोल पाईप ेमोकळा करून द्यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकºयांनी केली आहे.रस्त्यालगत माझे शेत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डा बुजविण्यासाठी रपट्यातील पाणी निघण्याचा गोल सिमेंटचा पाईप बुजविल्याने पावसाचे पाणी निघण्याचा मार्ग बंद झाल्याने शेतीचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.- नंदकिशोर बोबडे,अन्यायग्रस्त शेतकरी, अंतरगाव (बु)
पाण्याचा पाईप बुजविला शेतीचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:56 IST
रस्त्यावर पडलेला खड्डा बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रपट्यातील पाणी निघण्याचा पाईप पूर्णत: बंद केल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने खड्डा बुजविण्यासाठी चक्क टिनपत्रे लावल्याने पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
पाण्याचा पाईप बुजविला शेतीचे मोठे नुकसान
ठळक मुद्देबांधकाम विभागाचा प्रताप : टिनपत्रे टाकून बुजविला खड्डा