शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीने राख टाकल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह थांबला

By admin | Updated: September 27, 2015 00:44 IST

तालुक्यातील मरेगाव स्थित ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर निघणारी राख चक्क जिल्हा परिषदेच्या सिंचाई ...

शेतकऱ्यांच्या शेताला पाणी बंद : परिसरात प्रदूषण वाढलेमूल : तालुक्यातील मरेगाव स्थित ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर निघणारी राख चक्क जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या तलावात टाकल्याने शेताकडे जाणारा पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पोहचणे बंद झाले आहे. तसेच राखेमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. याबाबत मरेगावच्या नागरिकांनी आमदार शोभाताई फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.मूल तालुक्यातील मरेगाव, आकापूर या गावालगत अनेक उद्योग कार्यरत आहेत. तसेच उद्योगासाठी जवळपास सर्वच जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. परिसरात उद्योग येत आहेत, ही चांगली बाब असली तरी उत्पादनानंतर निघणाऱ्या राखीची विल्हेवाट लावणे हेही तेवढेच महत्त्वाचे काम आहे. येथील ग्रेटा एनर्जी कंपनीने वीज उत्पादन केल्यानंतर राख टाकण्यासाठी बाबुराव लिंगा पेंदोर व इतर जणांकडून करारनाम्यानुसार जागा भाड्याने घेतली. वास्तविक सदर जागा शासकीय वाटपात मिळाली असल्याने भाड्याने देता येत नाही. असे असतानादेखील भाड्याने जागा घेऊन कंपनीने राख टाकण्यास सुरूवात केली. राख एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकली गेली की जवळच असलेल्या जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या तलावातील नहरातसुद्धा पसरली आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रवाह बंद झाला. या राखेमुळे प्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जवळच्या शेतकऱ्यांना या राखेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. गावातील नागरिकांनी आमदार शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन माहिती दिली. यावेळी फडणवीस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, राकेश रत्नावार आदींनी तलावाची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)