शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीवर १०० सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 23:33 IST

सोमवारी मोठ्या उत्साहात जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाले. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर नजर केंद्रीत केली आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला विशेष सूचनाही दिल्या आहे.

ठळक मुद्देअट्टल दारूविके्रेत्यांना करणार जेरबंद : ९०० पोलीस कर्मचारी राहणार तैनात

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या असून यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिरवणुकीतील हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १०० सीसीटीव्हींची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दारूविक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून अट्टल दारुविक्रेत्यांना विसर्जनाच्या दिवशी जेलबंद करण्यात येणार आहे.सोमवारी मोठ्या उत्साहात जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाले. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर नजर केंद्रीत केली आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला विशेष सूचनाही दिल्या आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरात गुरुवारी सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरातील विविध मार्गांवर मचाणीही उभारल्या आहेत. काही दिवसात विधानसभा निवडणूक आहे. यामुळे मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ५० तसेच महापालिकेद्वारे ५० असे एकूण १०० सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील विविध मार्गांवर लावण्यात येणार असून याद्वारे मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी लक्षात घेता शहरातील अट्टल दारूविक्रेते पोलिसांच्या रडारवर त्यांना जेलबंद करण्यात येणार असून ९०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईमुंबई पोलीस कायद्यातील विविध कलमांचा वापर करून त्याअंतर्गत संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर उत्सवापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, शहरातील किमान ५० च्या वर अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असून त्यांना ३ ते ४ दिवसांसाठी जिल्हाबंदी करण्यात येणार आहे.गुरुवारी चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर येथे विसर्जनचंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर येथे अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. तसेच मूल, राजुरा येथील गणेश विसर्जन १३ सप्टेंबर रोजी तर ब्रह्मपुरी येथील गणेश विसर्जन १४ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये, मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी विविध उपाययोजन करण्यात आल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान संशयास्पद स्थितीत कुणी आढळून आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी.-डॉ.महेश्वर रेड्डी,जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :cctvसीसीटीव्ही