शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याचा घोटाळा पुन्हा चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2015 00:44 IST

चंद्रपूर महानगरपालिका नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. रस्त्याचे बांधकाम असो, पाणी पुरवठा असो की भूमिगत मलनिस्सारण योजना असो,...

मनपा वर्तुळात खळबळ : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकाचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. रस्त्याचे बांधकाम असो, पाणी पुरवठा असो की भूमिगत मलनिस्सारण योजना असो, मनपाचे प्रत्येक काम वादातच अडकत असल्याचा अनुभव आता चंद्रपूरकरांना नित्याचा झाला आहे. काही दिवस शांत असलेला कचरा घोटाळ्याचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याची मनपाची योजना आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात पोहचली आहे. या योजनेत नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. गेल्या आठ महिन्यापासून चंद्रपूर महानगरपालिकेचे घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे प्रकरण चंद्रपुरात गाजत आहे. आतातर सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन (सीडीसी) शाखा नागपूरला अधिक दराने कचरा संकलनाचे काम देण्यात आले असून हे कंत्राट रद्द करून निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी घनश्याम वासेकर, जगन्नाथ माडेकर आणि काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी न्यायालयाचा दरवाना ठोठावला आहे. या तिघांची संयुक्त याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे.घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे कंत्राट सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन देताना मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. सन २०१३ मध्ये स्वच्छतेसबंधी झालेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर शहर महाराष्ट्रात १३ व्या क्रमांकावर होते. शहरातील कचरा उचलण्याचे काम सहा महिण्यापूर्वीपर्यंत बचतगटांकडे होते. त्यावेळी १८८ बचतगटातील महिलांना प्रति महिना हजार रुपये दिले जात होते. आता नव्या दरानुसार प्रतिमहिना २४ हजार रुपये दिले जात आहे. कचरा उचलण्यासाठी १० गाड्या असून प्रत्येकी ८४ हजार रुपये दिले जात आहेत. म्हणजेच बचत गट महिला आणि कचरा उलचणाऱ्या गाड्या मिळून महिन्याला ५३ लाख ५२ हजार रुपये या कंत्राटी कंपनीकडे दिले जात आहे. मात्र, कंपनीकडून महिलांना महिन्याकाठी २४ हजार रुपये न देता सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. कचरा संकलनाच्या निवेदनासंबंधी महानगरपालिकेच्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावर कोणतीही चर्चा न करता आयुक्त सुधीर शंभरकर यांनी कंपनीचे संचालक कमलेश शर्मा आणि आरती पुरोहित यांच्याशी शासकीय विश्रामगृहात आ. नाना शामकुळे यांच्या उपस्थितीत चर्चा केली आणि चुकीचे निगोसेशन केले असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी अवाजवी दराने सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशनला घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे कंत्राट दिल्याचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. मनपाच्या आमसभेतही चांगले वादळ उठले होते.(शहर प्रतिनिधी)यापूर्वीच होते कचरा उचलण्याचे कंत्राटसेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन कंपनीला घराघरातून कचरा संकलन करण्याचे कंत्राट देण्यापूर्वी शहरातील कचरा उचलून तो डम्पींग यार्डवर टाकण्याचे कंत्राट याच सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन कंपनीला देण्यात आले होते. हे काम सुरूच आहे. सदर कंत्राट सुरू असताना पुन्हा नाहक घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी एवढा अवाढव्य खर्च का करण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.