शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

वासेनीरा तलाव फुटण्याच्या स्थितीत

By admin | Updated: July 3, 2015 01:20 IST

राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा-खातोडा जंगलात असलेल्या वासेनीरा तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे.

सिंचनाचा प्रश्न : तलाव दुरुस्त करण्याची मागणीपेंढरी (कोके): राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा-खातोडा जंगलात असलेल्या वासेनीरा तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे. यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार असून याकडे लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाने लक्ष देऊन तलाव दुरूस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.सिंदेवाही-चिमूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सरांडी-गोंदेडा गावालगत ताडोबा जंगलात वासेनीरा तलाव आहे. या तलावाच्या भरवशावर खातोडा, वडसी, गोंदेडा, केवाडा वाघेडा येथील शेतकरी अवलंबून आहेत. तसेच या तलावातील पाण्यावर पेंढरी (कोके) केवाडा (पेठ) गोंदोडा येथील मच्छीमार अवलंबून आहेत. परंतु सततच्या पावसामुळे या तलावाच्या पाळीला जिकडे तिकडे भोक पडल्यामुळे पाणी बाहेर जात आहे. या पाण्यासोबतच मासे बाहेर जात असल्यामुळे त्यावर उपजिविका करणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तलाव दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तलावाच्या पाण्यावर अनेक शेतकरी अवलंबून असून तलावाची दुरूस्ती न झाल्यास शेतकऱ्यांना पीक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तरी संबधीत विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन तलावाची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)