शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यातून वर्धेत दारुचा पुरवठा

By admin | Updated: June 15, 2014 23:28 IST

वरोरा शहरात अलीकडच्या काळात दारूविक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मद्यदुकानदार गब्बल बनत चालले आहे. ही दारूविक्री केवळ वरोरा येथील मद्यपींच्याच भरोशावर नसून वरोरावासीयांच्या नावावर दारुबंदी

चंद्रपूर : वरोरा शहरात अलीकडच्या काळात दारूविक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मद्यदुकानदार गब्बल बनत चालले आहे. ही दारूविक्री केवळ वरोरा येथील मद्यपींच्याच भरोशावर नसून वरोरावासीयांच्या नावावर दारुबंदी असलेल्या वर्धेतील मद्यपींसाठी ही दारू जात असल्याची खात्रीशीर माहिती आहे. वरोरा पोलीस ठाण्यांतर्गत चालु महिन्यात तब्बल १ लाख ६८ हजार १७३ लिटर दारुची विक्री झाली. या शहराची १८ वर्षावरील पुरुषांची संख्या केवळ १६ हजार आहे. हे सर्वच मद्य घेतात, असे गृहीत धरले तरीही या प्रत्येकाच्या वाट्याला रोेज ३५० मि.मी. मद्य येते. हे मोजमाप न पिताच कोणालाही ‘नशा’ चढविणारे आहे. मात्र, मद्यविक्रीचा आकडा वाढण्यामागे वेगळेच कारण असल्याचा जाणकारांचा दावा आहे. वरोरा येथून दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात सर्रास मद्य पोहोचविले जाते. त्यामुळे येथील दारुविक्रीची आकडेवारी वाढलेली आहे.वर्धा येथे दारु पोहोचविण्यासाठी मद्यतस्करांसाठी वरोरा हे शहर सोयीचे आहे. वरोरा पोलीस ठाण्यांतर्गतत २० बार, सहा देशी दारुची दुकाने, दोन वाईन शॉपी, चार बीअर शॉपी आहेत. १६ हजारांच्या शहरात एवढ्या मोठ्या संख्येत बारची संख्या कुणालाही चक्रावून टाकणारी आहे. मात्र यामागे मोठे अर्थपूर्ण गणित असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहराची १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या १६ हजार असताना महिन्याकाठी तब्बल १ लाख ६८ हजार १६३ लिटरच्या जवळपास मद्यविक्री होत आहे. याचाच अर्थ असा की येथील प्रत्येक पुरुष रोज ३५० मि.मी. मद्य घेतो. हे शक्यच नाही. त्यामुळे ही दारु नेमकी जाते कुठे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी वर्धा जिल्ह्यात असल्याचे सांगितले. मद्यविक्रीचा आकडा हा अधिकृत आहे. याशिवाय अवैध दारुची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. ती वेगळीच आहे. ग्रामीण भागात तसेच वरोरा शहरात अवैध मद्यविक्री सर्रास सुरू आहे. पोलिसांच्या नजरेत हा प्रकार का आली नाही, हा प्रश्न आहे.