शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित

By admin | Updated: December 7, 2014 22:49 IST

राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून

चंद्रपूर : राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून वंचित राहत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे.वर्धा नदी पट्ट्यातील कोलगाव, कढोली बु. मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, मार्डा, कुर्ली, किनबोडी, वरोडा, नांदगाव सूर्याचा, साखरी वाघोबा, पोवनी, माथरा, गोवरी, कोराडी, निमनी, चिंचोली, कवठाळा, जैतापूर, अंतरगाव, गोयगाव आदी गावातील शेतजमीन सुपिक आहे. कापूस, मिरची, सोयाबिन, गहू, चणा आदी या भागातील प्रमुख पीक आहेत. येथील कास्तकारांनी आपले शेतात मोठी गुंतवणूक करुन बोअरवेल आणि विहीरीचे बांधकाम केले. मात्र मुबलक पाणी असताना देखील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोटारपंप जळत आहेत. परिणामी पिकांना पाण्याची गरज असतानाही ते देता येत नसल्यामुळे पीक डोळ्यादेखत करपत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.या परिसराला विरुर स्टेशन येथील सबस्टेशनमधुन विद्युत पुरवठा होतो. गोवरी येथे याचे फिडर आहे. मात्र लोड वाढल्यामुळे कमी व्होल्टेजचा वीजपुरवठा होतो अथवा वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे नव्या सब स्टेशनच्या प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. वास्तविक वरोडा, निर्ली आणि साखरी येथे शासकीय जमीन उपलब्ध असून वीज वितरण कंपनीने हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या परिसरातील कास्तकारांचे अडचणींचा विचार करुन संवेदनशिलता दाखवित हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे, लक्ष्मणराव एकरे, विनोद झाडे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, दीपक पानघाटे, रतन वैद्य, मंगेश भोयर, किशोर ढुमणे, सुरेश पोडे, घटे, उत्तम बोबडे, अरुण उरकुडे, नत्थू पाटील बोबडे, लहू पाटील भोयर, कवडू कौरासे, कवडू गोरे, रवींद्र चटके, सुरेश वराटे, सुभाष गानफाडे, पुंडलिक ताजणे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, गणपत हिंगाणे, दीपक पाचभाई, श्रावण मालेकर, नीळकंठ दुबे, संजय उमरे, सुनील वनकर, नंदकिशोर कौरासे, मारोती क्षीरसागर, संजय गोरे, सुरेश ढुमणे आणि परिसरातील कास्तकारांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)