शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:25 IST

प्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापूस या ...

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून असतो. कापूस पिकविण्यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत कापसाला बाजारपेठेत मिळणारा दर तोकडा आहे. फेब्रुवारी महिना संपायला आला तरी कापसाचे दर अजूनही वाढले नसल्याने शेतकºयांनी कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत घरीच ठेवला आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.विदर्भ प्रांत कापूस पिकासाठी अग्रेसर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते, दरवर्षी शेतकरी कापसावर खूप मोठा खर्च करतात. त्या तुलनेत उत्पादन होणे आवश्यक आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढल्याने कोरडवाहू शेतीला मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून शेती केली. मात्र यावर्षी शेतकºयांच्या उत्पादनाचा टक्का घसरला आहे. यंदा उत्पादन घटल्याने शेतकºयांना शेती करणे न परवडणारे झाले आहे. शेती नेहमीच संकटात सापडत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. शेती पिकत नसल्याने शेतीला मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे.अनेक शेतकºयांनी गरजेपोटी कवडीमोल भावात कापसाची विक्री केली. खरे तर कमी दरात शेतमाल विकणे परवडत नाही. परंतु शेतकºयांचा नाईलाज असतो. सुरुवातीला कापसाचे दर चांगले होते. पाच हजार ८०० रुपयापर्यंत कापूस विकला जायचा. मात्र अचानक कापसाचे दर तब्बल ५०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाच हजार ३०० रुपयापासून उत्पादनावर झालेला खर्च बघता हा दर शेतकºयांना परवडणारा नाही. कापसाचे भाव वाढेल, या आशेवर कापूस घरीच आहे.कापूस विकल्यानंतर वाढतात दरमार्च महिन्यात शेतकºयांना बँकांकडून घेतलेले कर्ज भरायचे असते. त्यामुळे मार्च एंडींगपर्यंत शेतकºयांना शेतमाल विकणे गरजेचे असते. दरवर्षी शेतमाल विकल्यानंतरच दर वाढविले जातात. हा अनुभव शेतकºयांच्या पाठिशी आहे.कापूस पिकवायला मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्या तुलनेत कापसाला शासनाने दर देणे अपेक्षित आहे. तोकडा कापूस दर शेतकºयांना अजिबात परवडणारा नसल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी कापूस अजूनही घरीच ठेवला आहे.- चेतन बोभाटे, युवा शेतकरी, गोवरी

टॅग्स :cottonकापूस