शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नाफेडच्या चना खरेदीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:31 IST

हमी भावाने नाफेडने चना खरेदी करण्याकरिता एक हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात केवळ ३० शेतकऱ्यांचा चना खरेदी करुन नाफेडने तुर्तास चना खरेदी बंद केली आहे. खरेदीची अंतीम मुदत २९ मे असल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे.

ठळक मुद्देसध्या खरेदी बंद : मंगळवारपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : हमी भावाने नाफेडने चना खरेदी करण्याकरिता एक हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात केवळ ३० शेतकऱ्यांचा चना खरेदी करुन नाफेडने तुर्तास चना खरेदी बंद केली आहे. खरेदीची अंतीम मुदत २९ मे असल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे.शेतकऱ्यांचा चना निघताच बाजारभाव घटले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला चना विकायचा असल्याने आवश्यक कागदपत्र देवून एक हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यामध्ये चना खरेदी नाफेडने सुरु करीत केवळ ३० शेतकऱ्यांची चना खरेदी हमी भावाने केली. त्यानंतर चना खरेदी बंद केली.ती केव्हा सुरु होईल, याची माहिती नाफेडकडून मिळत नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी संभ्रमावस्थेत सापडले आहेत. येत्या काही दिवसात शेतीचा हंगाम सुरु होत असल्याने हंगामाकरिता लागणाºया साहित्याची जुळवाजुळव शेतकरी करीत आहे. घरात चना पडून आहे. खरेदीचा कुठलाही संदेश भ्रमणध्वनीवर पाठविला जात नाही. जास्त दिवस चना घरी राहिल्यास त्याची प्रतवारी खराब होण्याची शक्यता आहे. चना खरेदीची अंतीम तारीख २९ मे आहे.एवढ्या कमी कालावधीमध्ये नाफेड चना खरेदी करु शकत नाही, असे मत जाणकार व्यक्त करीत आहे. नाफेडने चना खरेदी केला नाही तर शेतीच्या हंगामात चुकारे मिळणार नाही,हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला आपली रक्कम राहूनही सावकाराचे दार ठोठावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.चना खरेदीला तुरीची आडकाठीनाफेडने खरेदी केलेली तूर बाजार समितीच्या आवारात सर्वत्र पडून आहे. तूर संथगतीने उचलली जात असल्याने चना खरेदीसाठी जागा शिल्लक नाही. चना खरेदी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे चना खरेदीला तुरीची आडकाठी आणल्याचे मानले जात आहे.नाफेडला चना खरेदीला सहकार्य करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तुरीची उचल केली नाही, नोंदणी केलेल्या शेतकºयांचा चना नाफेड खरेदी करणार नाही तर त्याची सर्व जबाबदारी नाफेडकडेच असणार आहे.- राजू चिकटे,उपसभापती बाजार समिती वरोरा,