शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णावासीयांना बसस्थानकाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 20, 2015 23:11 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त पोंभुर्णा तालुका मुख्यालयात बसस्थानकाअभावी प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पोंभुर्णा : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त पोंभुर्णा तालुका मुख्यालयात बसस्थानकाअभावी प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना उन्हात रस्त्यावर उभे राहून बसची वाट बघावी लागत आहे.पोंभुर्णा तालुक्याच्या निर्मितीला १५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र येथे अजूनपर्यंत सुसज्ज बसस्थानकाची निर्मिती झाली नाही. याठिकाणी मुख्य रस्त्यावर पंचायत समिती कार्यालयासमोर प्रवासी निवारा बांधण्यात आला. त्याला लागूनच ग्रामपंचायतीचे सार्वजनिक प्रसाधनगृह आहे. यातील घाणीचा निचरा होत नसल्याने त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा सामना करावा लागत आहे. काहींना तर साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याच प्रसाधनगृहाच्या बाजुला पंचायत समितीचे कार्यालय आहे. तेथील कर्मचाऱ्यांनासुद्धा सदर दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पोंभुर्णा तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी ग्रामीण परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला कामानिमित्त येत असतात. त्यामुळे त्यांना प्रवासी निवाऱ्याजवळ तासन्तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. याचा फटका शाळकरी विद्यार्थिनीना बसत आहे. येथील बसथांब्यालगत प्रसाधनगृहाची दुर्गंधी असल्याने प्रवासी जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीचा आश्रय घेतात. अनेक प्रवासी या त्रासाला कंटाळून खासगी वाहनातून प्रवास करताना दिसतात. यामुळे अनेकदा त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी एसटीचासुद्धा तोटा होतो. याठिकाणी सुसज्ज बसस्थानकाची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींना अनेकदा मागणी केली. पुढाऱ्यांनी आश्वासनेही दिले. मात्र याठिकाणी अद्यापही बसस्थानक झाले नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. बसस्थानक बांधकामाच्या दृष्टीने तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)