शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

वढोली-गोंडपिपरी महामार्ग खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST

वढोली : वढोली-गोंडपिपरी मार्ग खड्डेमय झाला असून, सहा किलोमीटरच्या प्रवासात एक, दोन नाही, तर तब्बल पन्नासहून अधिक खड्डे पडले ...

वढोली : वढोली-गोंडपिपरी मार्ग खड्डेमय झाला असून, सहा किलोमीटरच्या प्रवासात एक, दोन नाही, तर तब्बल पन्नासहून अधिक खड्डे पडले आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागतो. बांधकाम विभागाचे अधिकारी झोपले आहेत काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. गोंडपिपरी ते खेडी रोडचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी एका बाजूला अर्धा भाग खोदकाम केल्यामुळे व रस्त्यावर गिट्टी पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, खड्ड्यांचे रूपांतर डबक्यात झाले आहे. हे खड्डे आहेत की डबके, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

रस्त्यावर मोठमोठी गिट्टी पसरली असल्याने, दररोज या मार्गावर अपघात घडत असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे, तर काहींना अपंगत्व येत आहे. वारंवार खड्डे बुजविण्याची मागणी करूनही नागरिकांच्या मागणीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

खडड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने खडड्यात फसतात. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार वारंवार घडत असून, या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व खेडी-गोंडपिपरी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.

कोट

गोंडपिपरी-वढोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी पसरून आहे. दुचाकीसह चारचाकी वाहनही चालविताना मोठी कसरत करावी लागते. प्रवास सुरक्षित वाटत नाही. बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने खड्डे बुजवावेत.

- डॉ.नितेश पावडे, नागरिक, वढोली.