शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जोगी दुहेरी हत्याकांड घटनास्थळाला केंद्रीय मंत्र्यांची भेट

By admin | Updated: September 5, 2015 01:03 IST

३१ आॅगस्टच्या रात्री नांदा येथे घडलेल्या डॉ. जोगी दाम्पत्य हत्याकांडाला तीन दिवस लोटले असून पोलीस प्रशासनाच्या हाती मात्र कोणतेही धागेदोरे न लागल्याने ...

मुलीशी चर्चा : तीन दिवस लोटूनही तपास जैसे थेनांदाफाटा : ३१ आॅगस्टच्या रात्री नांदा येथे घडलेल्या डॉ. जोगी दाम्पत्य हत्याकांडाला तीन दिवस लोटले असून पोलीस प्रशासनाच्या हाती मात्र कोणतेही धागेदोरे न लागल्याने तपास संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. गावात अजूनही भीतिसदृश वातावरण असून गुरूवारी केंद्रीय रसायन व खते मंत्री हंसराज अहीर यांनी घटनास्थळाला भेट दिली व डॉ. जोगी यांच्या मुलीला मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल, असे आश्वासन दिले. ना. हंसराज अहीर यांनी पोलीस अधीक्षकासोबत बैठक निश्चित झाल्याचेही यावेळी सांगितले. घटनेचा तपास वरिष्ठ पातळीवर सुरु असून लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावला जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र स्थानिक गडचांदूर ठाणेदार केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान उपस्थित नव्हते. मंत्र्यांच्या सहकाऱ्याचा भ्रमणध्वनीवर काहीही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरुन ठाणेदारांना कॉल केला असता ठाणेदाराचा फोन सायलेंट मोडवर होता, असे चक्क उत्तर ना. अहीर यांना मिळाले. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा जागृतपणा यातून दिसून येणे. उपस्थित गावकऱ्यांनी गावात पोलीस गस्त ठेवावी, जोगी परिवाराला सामान्य सुरक्षा प्रदान करावी व नांदाफाटा पोलीस चौकीत मनुष्यबळ वाढवावे अशा अनेक मागण्या यावेळी केल्या. खुनाचा छडा लवकरात लवकर न लागल्यास संपूर्ण गाव रस्त्यावर उतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही गावकऱ्यांनी यावेळी दिला. यावेळी मंत्र्यासमवेत संजय मुसळे, पुरुषोत्तम निब्रड, सतीष कोम्मावार, शिवाजी शेलोकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पोलीस प्रशासनाच्या अल्प उपस्थितीमुळे मंत्र्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. (वार्ताहर)