शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST

चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली आहेत; मात्र या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या ...

चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली आहेत; मात्र या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वच बाजारपेठ सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू आहेत; मात्र बारमध्ये मोठी गर्दी उसळत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

बसमध्ये तिकीट ट्रे चा वापर

चंद्रपूर : महामंडळाने तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकीत तिकिटे फाडण्यासाठी नवी मशीन आणली होती. त्या मशीनद्वारे वाहक तिकीट फाडत होते; मात्र काही वर्षांतच या मशीनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या तिकीट ट्रेचा वापर सुरू आहे. काही मशीन चार्जिंग करण्यासाठी चार्जर नसल्याने मशीन बंद आहेत.

वजन काट्यांची तपासणी करावी

चंद्रपूर : दरवर्षी विक्रेत्यांच्या वजनकाट्याची तपासणी करण्याचे निर्देश आहेत; मात्र अनेक व्यापाऱ्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. भाजी बाजारामध्ये तर अनेक विक्रेते वजनाऐवजी दगडाचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

युवकांना राजकीय धडे देण्याची गरज

चंद्रपूर : सर्वच क्षेत्रांत युवक जात असले तरी राजकारणात युवकांचा शिरकाव कमी दिसून येत आहे. अनेकांमध्ये राजकारणाबाबत अनास्था आहे. त्यामुळे राजकीय पद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी युवकांना राजकीय विश्लेषकांद्वारे मार्गदर्शन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : दिवसेंदिवस मुलींच्या अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज एक तरी मुलगी छेडछाडीची किंवा अत्याचाराची बळी ठरत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या नराधमांना धडा शिकविण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, शहर पातळीवर मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे

चंद्रपूर : गृहविभागाने पोलीस भरती घेण्याची घोषणा केली आहे, तसेच सैन्यभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक या भरतीत सहभागी व्हावे, या उद्देशाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे.

मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे

चंद्रपूर : सगळीकडे संगणकीय कामाला सुरुवात झाली आहे. संगणक साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी शासनातर्फे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत होते; मात्र आता हे प्रशिक्षण बंद करण्यात आले आहे. याउलट खासगी संगणकचालक वारेमाप पैसे घेतात. त्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थी ते शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यामुळे शासनाने मोफत संगणक प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी आहे.

महिला शौचालयाची निर्मिती करावी

चंद्रपूर : शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र शहरातील एकाही चौकात महिला शौचालय नाही. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. अनेकदा महिला शौचालयाची मनपाकडे मागणी करण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

चंद्रपूर शहरात वाहतुकीचा खोळंबा

चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यावर मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे.