शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

गावे महाराष्ट्राची; विकास कामे तेलंगणची

By admin | Updated: May 11, 2017 00:35 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील ते १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्राचीच आहे,...

नागपूर खंडपीठाचा निर्णय : वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्राचीच फारुख शेख । लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील ते १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्राचीच आहे, असा निर्णय नागपूर- खंडपीठाने दिला. असे असतानाही या गावात तेलंगणा सरकारने विकास कामांचा सपाटा सुरु केला आहे.जिवती तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या वादग्रस्त गावापैकी एक आहे पुडियाल मोहदा. या गावाची लोकसंख्या ४०० आहे. येथे शासकीय विहीर एक, बोअरवेल एक आहे. बोअरवेल बंद अवस्थेत असून विहीरही कोरडी पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावापासून तालुका मुख्यालय १६ किमी तर तेलंगणातील मंडळ केरामेरी २० किमी अंतरावर आहे. गावात आतापर्यंत एसटी पोहचलेली नाही. गावात विद्युत खांब टाकून तीन ते चार वर्ष लोटले असून विद्युत पुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. उलट या गावात तेलंगणा राज्यातील विद्युत पुरवठा चालू आहे.१४ वादग्रस्त गावे ही महाराष्ट्राची असूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे तर तेलंगणा राज्याने मात्र विकास कामाचा सपाटा सुरू केला आहे. या गावांची मुख्य समस्या पिण्याचे पाणी आहे. तेलंगणा शासन तीन कोटी खर्चून पाण्याची टाकी उभारत आहे. यामुळे भोलापठार, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, रोझापूर, नारायणगुडा या गावांना पाणी मिळणार आहे. मात्र येथील नागरिकांना महाराष्ट्रातच राहायचे असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारच्या योजना व विकास कामे हवी आहेत.दरम्यान, पुडियाल मोहदा ग्रामपंचायतीच्या सदस्य लक्ष्मीबाई बाबूजी कोटुले, वाघुजी कोंडीबा कोटुळे, शामराव भुरकुटे, सखाराम मिरासे, मारोती कोटुळे यांनी आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे असून पिण्याचे पाणी, विद्युत मीटरसाठी जिवती येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणताच अधिकारी व नेते गावात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.