शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या जडवाहतुकीविरोधात गावकऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: March 19, 2017 00:33 IST

पैनगंगा वेकोलि प्रकल्पांतर्गत येत असलेल्या गाडेगाव (वि) येथील नागरिकांनी वेकोलिच्या जड वाहतुकीविरोधात बेमुदत आंदोलन पुकारले आहे.

आरोग्य धोक्यात : गावामधून होते वेकोलिची वाहतूकआवारपूर : पैनगंगा वेकोलि प्रकल्पांतर्गत येत असलेल्या गाडेगाव (वि) येथील नागरिकांनी वेकोलिच्या जड वाहतुकीविरोधात बेमुदत आंदोलन पुकारले आहे.वेकोलिने गाडेगाव या गावाला दत्तक घेतले आहे. मुख्य खदानीमध्ये जाण्यासाठी गावातील रस्त्याचा अवलंब कराव लागतो. त्यामुळे या मार्गाने गावामधून रोज शेकडो जड वाहनांची रेलचेल असते. यामुळे या गावातील लोकाना जडवाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो. याशिवाय रस्त्याचेही तीनतेरा वाजतात. इतर त्रास वेगळाच. त्यामुळे गावकरी कंटाळलेले आहे. गावाच्या मध्यभागातून वाहतूक होत असल्याने प्रत्येकाच्या घरात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. गावातील प्रत्येक नागरिक हा आज कोणत्या न कोणत्या आजाराने ग्रस्त झाला आहे. एवढेच नाही तर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याने शेजारील मौजा विरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाण्यास तारेवरची कसरत करावी लागत असून नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहे. खदानीच्या ब्लास्टिंगमुळे घरांना धोका निर्माण झाला असून घरातील भांडे रोजच पडतात. ध्वनी प्रदूषणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे पीक धुळीमुळे काळे झाले आहे. (वार्ताहर)आजपर्यंत अनेकदा आम्ही वेकोलि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यांनी थोडीही आत्मीयता दाखवलेली नाही. रस्तावर येण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. जोपर्यंत वेकोलि आपला पर्यायी रस्ता तयार करून देणार नाही, तोपर्यंत वेकोलिच्या जड वाहतूक गावामधून जाऊ देणार नाही - शारदा दौलत झाडे, सरपंच, गाडेगाव.