शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोअर झोनमधून होणार गावाचे स्थलांतर

By admin | Updated: October 24, 2016 00:57 IST

जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील दोन गावे आधीच स्थलांतरित करण्यात आली आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : गावाच्या पुनर्वसनाला केंद्र सरकारची मान्यतामिलिंद कीर्ती चंद्रपूरजिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील दोन गावे आधीच स्थलांतरित करण्यात आली आहेत. आता पळसगाव (सिंगरू)च्या स्थलांतराला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्याकरिता ३०० एकरचे जंगल साफ केले जाणार आहे.पळसगाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये असले तरी सध्या त्या गावापर्यंत एस. टी. बस जात असते. पाच गावांपैकी जामनी व रामदेगी (नवेगाव) ही दोन गावे चिमूर तालुक्यातील खडसंगीजवळ आमडी येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. जिल्हा पुनर्वसन विभागातर्फे जामनीच्या २२२ कुटुंबांपैकी २०१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. रामदेगी (नवेगाव)च्या २४० कुटुंबांपैकी २३९ कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे.बोटेझरीचे ६९ कुटुंब भगवानपूर येथे स्थलांतरित झाली आहेत. कोळसा या गावच्या बहुसंख्य लोकांचा विरोध स्थलांतराला विरोध आहे. कोळसा येथील २२१ पैकी पहिल्या टप्प्यात ४९ कुटुंब भगवानपूरला स्थलांतरित झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ६७ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. उर्वरित कुटुंबांनी गाव सोडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांच्यानुसार, गावकऱ्यांनी आता स्थलांतराचा निर्णय घेतला पाहिजे. वर्धा जिल्ह्यातील बोर प्रकल्पाच्या जंगलाचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे ताडोबासाठीही प्रस्ताव मंजूर करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.बोटेझरीचे स्थलांतर केल्यावर या गावकऱ्यांचे पुनर्वसन व्यवस्थित करण्यात आले नसल्याची ओरड सुरू आहे. त्यामुळे कोळसा येथील नागरिकदेखील अडून बसले आहेत. पळसगावनंतर रानतळोधीच्या स्थलांतराचाही प्रश्न शिल्लक आहे. मात्र, शासनाने सुविधा बंद केल्यावर कोळसा येथील गावकऱ्यांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.गेल्या अनेक दिवसांपासून ताडोबाच्या कोअर झोनमधील गावांचे स्थलांतर रखडलेले होते. आता पळसगावला केंद्राने मान्यता दिली असल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.अटी व शर्र्तींवर स्थलांतरपळसगाव (सिंगरू)चे स्थलांतर करण्यास केंद्र सरकारने काही अटी व शर्ती घालून ९ सप्टेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पळसगावसाठी वरोरा तालुक्यातील पेव्हारा कंपार्टमेंटमधील सालोरी बीट येथील ३०० एकर जंगल तोडण्यात येणार आहे. पळसगावमध्ये १९० कुटुंब राहतात. ते स्थलांतरित झाल्यावर एस.टी.बस बंद करण्यात येणार आहे.