शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू

By admin | Updated: March 7, 2016 00:44 IST

गावाच्या विकासात स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन त्यांनी सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी.

चंदूपाटील मारकवार : अंबुजा सिमेंटतर्फे स्वच्छता मेळावागडचांदूर : गावाच्या विकासात स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन त्यांनी सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी. तेव्हा संपूर्ण गाव स्वच्छ होईल ते सर्व बाजूनी समृद्ध होईल म्हणून स्वच्छता हा समृद्ध ग्रामविकासाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन आदर्श गाव राजगडचे उपसरपंच चंदू मारकवार यांनी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन, उपरवाहीच्या वतीने आयोजित स्वच्छता मेळावा कार्यक्रमात केले.अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने स्थानिक कार्यालयाच्या सभामंडपात स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक राजगडचे उपसरपंच चंदू मारकवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे कार्यक्रम समन्वयक सोपान नागरगोजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून निप्पो आरओ प्लँटचे अध्यक्ष अनिल पोहोणे, प्रा. डॉ. शरद बेलोरकर, कोरपना पंचायत समितीचे अधिकारी लाटेलवार, खोब्रागडे आदी उपस्थित होते. स्वच्छता मेळावा कार्यक्रमानिमित्त परिसरातील आदर्श व निर्मल ग्राम होण्यासाठी प्रयत्नशिल असणाऱ्या पिंपळगाव, कुकडसाथ, आसन बुज. आसन खुर्द, वरझडी, कुसळ, हरदोना बुज. लखमापूर या गावांचा त्यांच्या कार्यासाठी सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कार्यक्रम समन्वयक जितेंद्र बैक यांनी केले. संचालन सरोज अंबागडे यांनी तर आभार कल्पना भेंडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता अंबुजा सिमेंट फाऊंडशनचे सुजीत नगराळे, गोपाल कोटनाके, नीलम हरिनखेडे, लिना तेलंग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील गावकरी बहुसंख्येने हजर होते. (वार्ताहर)