शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी युरिया खत उपलब्ध

By admin | Updated: September 21, 2014 23:48 IST

जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवू लागला होता. तक्रारींचा ओघ वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने वरिष्ठ अधिकारी व कंपन्यांकडून तगादा लावून जिल्ह्यासाठी युरियाची रॅक

चंद्रपूर : जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा जाणवू लागला होता. तक्रारींचा ओघ वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने वरिष्ठ अधिकारी व कंपन्यांकडून तगादा लावून जिल्ह्यासाठी युरियाची रॅक मिळवण्यात यश मिळविल आहे. रविवारी २८२४ मेट्रिक टन खताची रॅक लागली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेल्वेस्थानक परिसरातील मालधक्क्यावर चोख बंदोबस्तात जिल्ह्यातील सुमारे २०० केंद्रांवर खत रवाना केले.कृषी आयुक्तालयाकडून जिल्हाभरासाठी सप्टेंबर महिन्यात ५१०० मेट्रिक टन युरियाचे आवंटन देण्यात आले होते. त्यानुसार आरसीएफची पहिली रॅक ८ सप्टेंबरला वितरित करण्यात आली. २६०० मेट्रिक टनच्या खतामुळे जिल्ह्याची गरज भागत नव्हती. त्यामुळे पुन्हा युरियाची रॅक मिळविण्यासाठी कृषी विभागाने परिश्रम घेतले. रविवारी ही रॅक लागताच व जिल्ह्यातील युरियाची मागणी पाहता अधिकाऱ्यांनी रॅक पाईटवर जागोजागी कर्मचाऱ्यांना तैनात करुन खताचे वितरण सुरु केले. पहाटेपासून तालुकास्तरावर खत रवाना होत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व तालुकास्तरावर युरिया पोहोचणार आहे. संबंधित केंद्रावर खत पोहोचल्यानंतर तालुक्यातील वितरणाची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यांची राहणार असून त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच युरियाचे वाटप होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरिया मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे प्रयत्न असून जिल्हाभरात किमान २५० अधिकारी व कर्मचारी युरियाच्या वितरणावर नजर ठेवून राहणार आहे.उशिरा आलेल्या पावसामुळे अचानक युरियाची मागणी वाढली होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा तुटवडा सुद्धा निर्माण झाला होता. त्यामुळे कृषी विभागाने सप्टेंबर महिन्यात आलेल्या दोन्ही रॅकचे व्यवस्थीत नियोजन केल्याने प्रत्येक तालुक्यात मागणीनुसार युरियाचा पुरवठा होणार आहे. यापूर्वी गेल्या ३० वर्षात रॅक पार्इंटवर कधीही कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले नव्हते. परंतु रविवारी पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट चालक व अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)