शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लाडबोरी येथे बुद्ध मूर्तीचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 00:51 IST

सिंदेवाही तालुक्यातील बौद्ध समाज लाडबोरीच्या वतीने बुद्ध मूर्तीचे अनावरण आणि बुद्ध विहार लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील बौद्ध समाज लाडबोरीच्या वतीने बुद्ध मूर्तीचे अनावरण आणि बुद्ध विहार लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.या दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी धम्म ध्वजारोहण, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे (साडेसात फुट उंच) अनावरण व महामाया बुद्ध विहाराचे लोकार्पण बुद्धस्वरूप दाानकर्ते भन्ते डॉ. अनेक (थायलंड) यांच्या हस्ते व भिक्खुसंघ (थायलंड) यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भन्ते डॉ. अनेक थायलंड तर अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश माने मुंबई, प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते सुनान, भन्ते सेन्ता, भन्ते अषीचाई, सन्नी सीरी (सर्व थायलंड), खासदार अशोक नेते, भैय्या खैरकार, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी किशोर गजभिये, मारोतराव कांबळे (ब्रह्मपुरी), दिनेश पाटील (नागपूर), चित्तरंजन नागदेवते (नागपूर) व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळी विमल नामदेव नागदेवते यांचा डॉ. अनेक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दाद नागदेवते, संचालन चंद्रप्रकाश चहांदे तर आभार माजी सरपंच प्रदीप नागदेवते यांनी मानले. सायंकाळी भन्ते संघवंश मुलटेकडी (कुशीनगर उ.प्र.) यांच्याकडून धम्मदेसना कार्यक्रम झाला. रात्री प्रबोधनकार भगवानदादा गावंडे व त्यांच्या संचाकडून प्रबोधनात्मक कार्यक्र्रम झाला. (वार्ताहर)