शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने परीक्षा शुल्क कमी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:28 IST

राजुरा : सध्या संपूर्ण देशात कोविड-१९ या महामारीने बिकट परिस्थिती निर्माण केलेली आहे. अनेकांना आपल्या रोजगार, व्यवसायाला मुकावे लागले ...

राजुरा : सध्या संपूर्ण देशात कोविड-१९ या महामारीने बिकट परिस्थिती निर्माण केलेली आहे. अनेकांना आपल्या रोजगार, व्यवसायाला मुकावे लागले आहे. हातचा रोजगार गेल्याने जीवन जगण्याचे मोठे संकट समोर उभे असतानाच आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न बघणाऱ्या पालकवर्गापुढे विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्काचेही संकट उभे ठाकले आहे.

पालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

गोंडवाना विद्यापीठाची पार्श्वभूमी ही आर्थिक, सामाजिक घटकांची प्रगती करत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता झाली असून, या परिस्थितीत परीक्षा शुल्क कमी करून विद्यार्थीवर्गाला आधार देण्याची मागणी बिईंग डिझायर बहुउद्देशीय संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व विद्यापीठाला वारंवार केली आहे. गोंडवाना विद्यापीठाने योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आधार देत परीक्षा शुल्क कमी करावे, अशी विनंती अक्षय डाकरे, दत्ता पुरोहित, अंशुल चामलवार, निखिल पटकोटवार, प्रथमेश दानव, गजू नागपुरे, रोशन नगराळे यांनी केली आहे.