७४-चिमूर विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांचा मतदानासाठी अतिशय निरुत्साह दिसून आला. या मतदार संघातून सर्वाधिक २९ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले. या क्रांतीभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमूर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसह नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र सकाळपासून मतदारांमध्ये निरूत्साह दिसून आला. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदानासाठी घराबाहेर निघण्याचे आवाहन केले जात होते. मात्र त्यालाही फार प्रतिसाद मिळाला नाही. संवेदनशिल अशी ओळख असलेल्या या मतदार संघात मतदान प्रक्रीयेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. या मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४.२९ टक्के मतदान झाले. दुपारनंतर गर्दी ओसरलीजिल्ह्याची मागणी असलेल्या चिमूरमध्ये यावेळी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निरूत्साह दाखविला. काहींनी जोपर्यंत जिल्हा होणार नाही, तोपर्यंत मतदानच न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा ऐकीवात आली. त्याचा परिणाम म्हणून दुपारनंतर मतदान केंद्रावरील गर्दी ओसरली. विधानसभेत घटली टक्केवारीचिमूर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीची टक्केवारी घटली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यामुळे विधानसभेतही तो उत्साह कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ती अपेक्षा मात्र फोल ठरली. ५ वाजेपर्यंत केवळ ४५.२९ टक्के मतदानसध्या शेतातील कामे जोमात सुरू आहे. त्यामुळे मजूर वर्गासह शेतकरीही शेतातील कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यातच दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी शेतपीक काढण्याचे काम सुरू आहे. परिणामी चिमूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानावर फरक पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ ४५.२९ टक्के मतदान झाले. अशीही जागृतीइंटरनेट आणि मोबाईलच्या युगातही मतदारांना जागृत करण्यासाठी तरूणांनी आपल्या डोक्यात कल्पना मोबाईलमध्ये उतरविल्या. आज दिवसभर अनेकांच्या मोबाईलवर व्हॉटस् अॅपद्वारे जनजागृतीचे संदेश सातत्याने पोहचविले जात होते. त्यामध्ये ‘माझे मत माझा अधिकार’, ‘माझ्या एका मताने नक्कीत फरक पडेल’, ‘आता हे राज्य तुमच्या हातात’, ‘परिक्षेत एका गुणाला, क्रीकेटमध्ये एका धावेला अन् लोकशाहीमध्ये एका मताला फार किंमत असते’, ‘मतदार ओळखपत्राचा उपयोग फक्त सीमकार्ड घेण्यासाठी नव्हे तर मतदानासाठी करा’, ‘मतदान करा देश घडवा’, एवढेच नव्हे तर ‘मतदान मेरा अधिकार-मतदान मेरी जिम्मेदारी’ अशा प्रकारचे संदेश मोबाईलद्वारे देण्यात येत होते.
मतदारांच्या निरुत्साहाने टक्केवारीला फटका
By admin | Updated: October 15, 2014 23:32 IST