शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसाय निवडणे आवश्यक

By admin | Updated: August 27, 2016 00:36 IST

परिस्थिती बदलत आहे. बदलत्या काळानुसार जे बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते, ते निर्माण करणे आवश्यक आहे.

सुधीर मुनगंटीवार : कृषी व वन आधारित पर्यटन कार्यशाळाचंद्रपूर : परिस्थिती बदलत आहे. बदलत्या काळानुसार जे बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते, ते निर्माण करणे आवश्यक आहे. अलिकडे रोजगार, व्यवसायाचे प्राधान्यक्रम बदलले आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार कृषी, वनांवर आधारित पर्यटनासारखे व्यवसाय निवडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.येथील वनराजिक प्रबोधनीच्या सभागृहात वन व कृषी विभाग तसेच आत्माच्या संयुक्त विद्यमाने कृषी व वनावर आधारित पर्यटनाबाबत आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, सभापती देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक पांडुरंग तावरे, वन प्रबोधनीचे संचालक अशोक खडसे, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा) विद्या मानकर, मार्गदर्शक अविनाश जोगदंड, रवी पाटील आदी उपस्थित होते.जिल्ह्याचे जंगल ही शक्ती आहे, या शक्तीचा उपयोग करुन रोजगार व्यवसाय कसे निर्माण होऊ शकतात. याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जिल्हयाच्या विकासासाठी ज्या ज्या योजना आणता येते, त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. कृषी व वन आधारित पर्यटनाला जिल्हयात संधी असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार रोजगाराचे हे क्षेत्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.जिल्हयाच्या विकासासाठी अनेक उपक्रम सुरु केले जात आहे. ६०० कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, २०० कोटी रुपये खर्चाची देशातील २६ वी सैनिकी शाळा, वन अकादमी, वनऔषधी रिसर्च सेंटर, चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र आपण करतो आहे. मानव विकासाच्या माध्यमातून रोजगारात पुढे जाण्यासाठी विविध क्लस्टर करत असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हयात २७ गावे आदर्श गावे म्हणून विकसित करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक पांडुरंग तावरे यांनी कृषी, पर्यटन व त्यातील संधी यावर प्रकाश टाकला. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत वन विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक वनसंरक्षक रामराव कुळकर्णी यांनी केले. तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी हिवरे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)