शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात अघोषित फटाकेमुक्त दिवाळी

By admin | Updated: November 4, 2016 01:20 IST

दिवाळी म्हटलं तर शहरांसह ग्रामीण भागातील लोकांसाठी वर्षातील अतिशय महत्त्वाचा सण असून यावेळी बाजारात खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

व्यापाऱ्यांनाही फटका : शेतकऱ्यांच्या आर्थिक अधोगतीचा परिणामकोरपना : दिवाळी म्हटलं तर शहरांसह ग्रामीण भागातील लोकांसाठी वर्षातील अतिशय महत्त्वाचा सण असून यावेळी बाजारात खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे दिवाळीचा सण सुरु असल्याची जाणीव होते. मात्र यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात उलट चित्र असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अघोषित फटाकेमुक्त दिवाळी सुरु असल्याचे जाणवत आहे.एरवी दिवाळीच्या सणात बाजारपेठेत इतका शुकशुकाट आढळत नव्हता. शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस काढला नाही. तसेच ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून शासनाकडून कसलाही आर्थिक आधार मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्याचा विपरित परिणाम शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीवर पडला असून व्यापारी प्रभावित झाले आहेत. वस्तूला मागणी नसल्यामुळे बाजारपेठेतील विक्री क्षमता निम्म्यावर आली असून व्यापाऱ्यांसाठी ‘बुरे दिन’ असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे. फटाका फोडल्याने काही फायदा होत नसला तरी फोडणाऱ्याला आनंद मिळतो. त्यातल्या त्यात फटाके फोडल्याशिवाय दिवाळीचा सण साजरा केल्यासारखे वाटत नसणारा वर्ग मोठा आहे. मात्र आर्थिक चणचण फटक्याच्या खरेदीला आड येत आहे. फटाके फोडण्याची इच्छा असूनही खरेदीक्षमता नसल्याने अनेकांना फटाके फोडण्याची मजा घेता आली नाही. बाजारपेठेत मंदी असल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)लोकांच्या हातात पैसा नसल्याने या दिवाळीत जवळपास सर्वच व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे ते लोक आॅनलाईन खरेदीकडे वळले आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूसह अनेक वस्तूंना बाजारात मागणी राहिली नाही. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा धंदा निम्म्यावर आल्याने आम्हा व्यापाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.-मो. सलीम मिठानी, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक, गडचांदूरदिवाळीतील मंदीमुळे कापड व्यावसायिकसुद्धा प्रभावित झाले असून लक्ष्मी पूजन व भाऊबीज या फक्त दोनच दिवस व्यवसाय व्यवस्थित चालला. दरवर्षी दहा-पंधरा दिवस चालणारा व्यवसाय यावर्षी मात्र दोन दिवसांवर येऊन पोहचला. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचीही दिवाळी अंधारातच चालली आहे.-हंसराज चौधरी, कापड व्यावसायिक, गडचांदूर