शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी - बस अपघातात दोन ठार

By admin | Updated: April 28, 2016 00:43 IST

येथून तीन किमी अंतरावर असलेल्या किटाळी येथील बसस्थानकावर समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस व दुचाकीत धडक बसली.

शंकरपूर : येथून तीन किमी अंतरावर असलेल्या किटाळी येथील बसस्थानकावर समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस व दुचाकीत धडक बसली. यात दोन जणांचा मृत्यू झाला तर १६ प्रवाशी जखमी आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.साखरचंद राजेराम बोरबांधे (५५) व बसमध्ये असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष डाखोरे अशी मृतांची नावे आहेत.आज सकाळी ९.३० च्या सुमारास ब्रह्मपुरी आगाराची बस (क्र. एचएच- ०७ सी ७७२७) प्रवासी घेऊन चिमूर मार्गे वरोराकडे जात होते. तर साखरचंद बोरबांधे व त्यांच्या पत्नी वंदना बोरबांधे दोघेही शंकरपूरकडे येत होते. बस स्टँड ओलांडताना समोरुन येणारी बस लक्षात आली नाही. बसचालकाला अचानक समोरुन दुचाकी येत असल्याचे लक्षात आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाने ब्रेक दाबला. यामुळे बसल पलटली व बसला दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीस्वार राजेराम बोरबांधे व बसमधील प्रवाशी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष डाखोरे यांचा मृत्यू झाला. बस उलटल्याचे लक्षात येताच गावातील गावकरी व रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांनी बसमधील इतर जखमी प्रवाशांना शंकरपूर येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भरती केले यात बसचालक श्रीकृष्ण काकपूरे (५०), डी. ए. सपकाळ ब्रह्मपुरी आगारचे कर्मचारी अविनाश गाठोडे रा. अकोला (५१) गंभीर जखमी आहेत.डाखोरेंच्या अपघाती निधनाने शंकरपूरवासी हळहळलेया अपघातात मृत डॉ. संतोष डाखोरे हे शंकरपूर येथील स्वास्थ केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून २००८ मध्ये रुजू झाले होते. त्यांनी येथे सहा वर्ष आपली सेवा दिली. यावेळी त्यांनी अनेकांची मने जिंकून घेतली होती. वैद्यकीय क्षेत्राच्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रमात ते भाग घेत असत. त्यामुळे डॉ. संतोष डाखोेरे यांनी जनसामान्याच्या व रुग्णांचा मनात घर केले होते. त्यांचे १५ दिवसांपूर्वीच साक्षगंध झाले होते. त्यांच्या या अकाली मृत्यूने शंकरपूरात हळहळ व्यक्त होत आहे.