शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी जप्त

By admin | Updated: December 9, 2014 22:46 IST

चिमूर तालुक्यातील भीसी वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या एफडीसीएमच्या राखीव वनक्षेत्रावरील कक्ष क्रमांक १७ मध्ये मंगळवारी स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी आढळून आल्या. ताडोबा अंधारी व्याघ्र

शिरपूर वनक्षेत्रातील घटना : वन्यजीवांच्या शिकारी टोळीचा संयशचंद्रपूर: चिमूर तालुक्यातील भीसी वनक्षेत्रातंर्गत येणाऱ्या एफडीसीएमच्या राखीव वनक्षेत्रावरील कक्ष क्रमांक १७ मध्ये मंगळवारी स्फोटकांच्या साहित्यासह दोन दुचाकी आढळून आल्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर बफर क्षेत्रात ही घटना उघडकीस आल्याने वनविभागाची झोप उडाली आहे.या दोन्ही दुचाकींचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी होत असावा, याची चौकशी सुरू असली तरी, वन्य जीवांच्या शिकारीसाठी आणि ठार केलेल्या प्राण्यांचे मास वाहून नेण्यासाठी या दुचाकींचा वापर होत असल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. या प्रकरणी जांभुळघाटमध्ये राहणाऱ्या मोहनसिंग जुन्नी नामक व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून या घटनेचे तार त्याच्याशी जुळत असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.प्राप्त माहितीनुसार, वनविकास महामंडळाच्या राखीव वनक्षेत्रावर दुपारी दोन दुचकी वाहने संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली. यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. मात्र दुपारनंतरही त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ती दोन्ही वाहने जप्त केली. या वाहनांपैकी एक स्लेंडर असून तिचा क्रमांक एमएच ४०/जी-६८७३ असा आहे. तर, दुसरी डिस्कव्हर असून तिचा क्रमांक एमएच ३४/एएल-४३२२ असा आहे. या वाहनांची तपासणी केली असता, एका वाहनावर एक पिशवी अडकविलेली आढळली. यात, स्फोटकांचे साहित्य, बारूद, स्क्रू, गोळ्या, छर्रे, बारूदीचे लहान हातगोळे असे विध्वसंक साहित्य आढळले. दुसऱ्या वाहनाच्या मागे मोठे कॅरिअर लावलेले असून जनावराचे मास लादून नेले जाईल, एवढा त्याचा आकार आहे. या प्रकरणी, वन परिक्षेत्र अधिकारी मल्लेलवार यांनी भीसी पोलीस स्टेशनला सूचना दिली. वृत्त लिहीपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. असा प्रकार पहिल्यांदाच आढळला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)