शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींना ट्रकची धडक, दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:12 IST

मानोराकडून जाणाऱ्या ट्रकची उमरी जवळील पांढरीमाता नाल्याजवळ दोन दुचाकींना धडक बसली. या अपघात रिना महादेव सातपुते (३३) रा. घनोटी विहीरगाव व सचिन रघुनाथ कावळे हे दोघे ठार झाले. तर दहा वर्षाच्या मुलीसह तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता घडली.

ठळक मुद्देतीन जण जखमी : उमरी-मानोरा मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मानोराकडून जाणाऱ्या ट्रकची उमरी जवळील पांढरीमाता नाल्याजवळ दोन दुचाकींना धडक बसली. या अपघात रिना महादेव सातपुते (३३) रा. घनोटी विहीरगाव व सचिन रघुनाथ कावळे हे दोघे ठार झाले. तर दहा वर्षाच्या मुलीसह तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता घडली.एमएच २९-८९१४ या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने मानोराकडून उमरीला जात होता. उमरीवरून मानोराकडे जाणारे महादेव सातपुते, त्यांची मुलगी सलोनी सातपुते (१०) व पत्नी रिना सातपुते हे तिघे जण एमएच ३४ एजी ६४३७ या क्रमांकाच्या तर त्यांच्या पुढे एमएच ३४ बीके ६९३२ या क्रमांकाच्या दुचाकीने पियुष मुर्लीधर जमदाळे व सचिन रघुनाथ कावळे रा. उमरी हे दोघे जात होते. ट्रकची पियुष व सचिन बसलेल्या दुचाकीला धडक बसली. त्यानंतर महादेव सातपुते यांच्या दुचाकीलाही उडविले. त्यात महादेव सातपुते यांची पत्नी रिना ट्रकच्या समोरील चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सर्व जण गंभीर जखमी झाले.अपघाताची वार्ता उमरीचे ठाणेदार प्रशांत मसराम यांना माहिती होताच घटनास्थळावर धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने चाकात दबलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. सर्व जण गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सचिन कावेळेचा मृत्यू झाला. पियुषचीही प्रकृती चिंताजनक आहे. ठाणेदार प्रशांत मसराम यांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनास्थळावरून ट्रक चालक व वाहक फरार झाले. त्यांची नावे कळलेली नाहीत. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.