शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार शाळा टीव्ही संचाविना

By admin | Updated: September 4, 2014 23:41 IST

शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. या आदेशाने शिक्षण विभागाची धावपळ सुरु झाली आहे. शिक्षण विभाग शाळांमध्ये

पंतप्रधानांचे भाषण : रेडिओ, मोबाईलचा आधारचंद्रपूर : शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. या आदेशाने शिक्षण विभागाची धावपळ सुरु झाली आहे. शिक्षण विभाग शाळांमध्ये व्यवस्था करण्याच्या तयारीला लागला असून शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर आदेश धडकल्याने अनेक शिक्षकांनी नाकमुरडत तयारीला लागले आहेत. शिक्षण विभागातून याबाबत माहिती घेतली असता, तब्बल दोन हजार शाळांमध्ये टीव्ही संच नसल्याची माहिती आहे. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यवस्था पूर्ण झाल्याचे सांगितले. सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याच्या सुचना आहेत. शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीला तसे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक शाळांत टीव्ही संच नाही. ज्या शाळांत आहेत, ते टीव्ही संच धुळखात पडले आहेत. नव्या आदेशाने आता ‘त्या’ टीव्ही संचावरील धुळ साफ होणार आहे. मात्र, ज्या शाळांमध्ये वीज नाही, अशा शाळांच्या शिक्षकांची पंचाईत झाली आहे. त्यांनी शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांची दारे ठोठावून व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा एक हजार ९५५ तर माध्यमिक ५५६ शाळा आहेत. यापैकी केवळ ४७९ शाळांमध्ये टीव्हीसंच आहे. उर्वरित शाळांमध्ये टीव्ही संचाची व्यवस्था नसल्याने रेडीओ, मोबाईलच्या माध्यमातून तसेच गावात कुणाच्या घरची टीव्ही आणून किंवा ग्रामपंचायतीच्या टीव्हीवर भाषण ऐकण्याची व्यवस्था केल्याचे शिक्षणाधिकारी देशपांडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक २ हजार ५११ शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक शाळांत एक लाख ६८ हजार ७९९ तर माध्यमिक शाळांत ५१ हजार ८४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळणार आहे. विभाग विद्यार्थ्यांना कितपत सुविधा उपलब्ध करून देते, याकडे लक्ष आहे.(स्थानिक प्रतिनिधी)