शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथाॅनमध्ये सहभागी झाले दोनशे स्पर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

माझी वसुंधरा अभियान : मानवी कर्तव्यांची दिली शपथ चंद्रपूर : ‘माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत ...

माझी वसुंधरा अभियान : मानवी कर्तव्यांची दिली शपथ

चंद्रपूर : ‘माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्यावतीने सायकल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचा प्रारंभ आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, संतोष कंदेवार, सहायक आयुक्त शीतल वाकडे, धनंजय सरनाईक, विद्या पाटील, महेश बारई, विजय बोरीकर, अनिल घुमडे, आशिष मोरे, रवींद्र हजारे, डाॅ. गोपाल मुंदडा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सकाळी गांधी चौकातून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी आपल्या वसुंधरेला सुरक्षित ठेवण्यासाठी मानवी कर्तव्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली. चंद्रपूर शहरातून मुख्य रस्त्याने गांधी चौक - प्रियदर्शिनी चौक - गांधी चौक असा स्पर्धेतील मार्ग निश्‍चित करण्यात आला होता. या मार्गावर महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आरोग्य विभागातर्फे उपस्थित सर्वांना सॅनिटायझरचा वापर करण्यास देण्यात आले. भाग घेणाऱ्या सर्व सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली होती.

यावेळी आयुक्त राजेश मोहिते म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखता यावा, शहर स्वच्छ, सुंदर व हरित व्हावे यासाठी शासनाने ‘माझी वसुंधरा’ या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिणे गरजेचे आहे. आपले शहर हे फार मोठे नाही. त्यामानाने शहरातील गाड्यांची संख्या मोठी आहे, आपल्यातील प्रत्येकाने जर रोज ५ किलोमीटर सायकल चालविण्याचा संकल्प केला तर पर्यावरणात मोठा फरक पडेल. मनपाचे कर्मचारी आठवड्यातील एक दिवस सायकलने येतात हाच कित्ता सर्वांनी गिरवायला हवा, असेही ते म्हणाले. योग नृत्य संस्थेद्वारा याप्रसंगी योग नृत्याद्वारे शारीरिक तंदुरूस्तीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रसंगी विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, सायकलिस्ट क्लब, स्वयंसेवी संस्था, इको प्रो, आयएमए, रोटरी, एसपीएम क्रिएशन आदींनी सहभाग घेतला.