शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

विजासन येथे तलावाच्या प्रकरणावरुन दोन गटात हाणामारी

By admin | Updated: December 7, 2014 22:47 IST

शहरातील विंजासन या भागातील तलावाच्या वादावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांवर चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय

भद्रावती : शहरातील विंजासन या भागातील तलावाच्या वादावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांवर चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपैकी न्यायालयाने ११ पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर पाच महिला व एक पुरुष आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली. पोलीस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.विंजासन या भागातील सर्व्हे नं. २ या ५२ एकरामधील तलावाचा गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयात वाद सुरु आहे. हा तलाव एका गटाच्या मालकीचा असून दुसरा गट त्या तलावातून मच्छी व शिंगाड्याचे पिक घेत आहे. त्याकरिता दुसरा गट पहिला गटाला वार्षिक पाच हजार रुपये किराया देत आहे. असे असताना या तलावातील उत्पादनात आपणालासुद्धा मालक बनवावे, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. या मागणीसाठी त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. तेव्हापासून या दोन गटात द्वेष निर्माण झाला आहे. यावरुन आजपर्यंत चार वेळा दोन्ही गटात जबरदस्त हाणामाऱ्या झाल्या. न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात लागेल अशी दुसऱ्या गटाची खात्री झाल्याने त्यांनी पहिल्या गटावर काल शनिवारी रात्री ८ वाजता लाठीकाठी व चाकूने हल्ला केला. त्यात एका महिलेसह पाच जण जखमी झाले. या सर्वांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सर्वांच्या प्रकृती धोक्याबाहेर आहे. यातील १७ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. या सर्व प्रकरणाचा तपास परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी फसके करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)