शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी चंद्रपुरात दुचाकीस्वार युवकांचा उच्छाद

By admin | Updated: January 29, 2016 04:20 IST

एकीकडे विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संस्था शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

चंद्रपूर : एकीकडे विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संस्था शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत असताना दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांवर युवकांची काही टोळकी अक्षरश: उच्छाद घालीत होती. मोटारसायकलवरून वेगाने फिरणारे हे माथेफिरू युवक अश्लिल शिव्यांची लाखोळी वाहत होते. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या महिला तरूणींसह सामान्य नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.चंद्रपूर शहरात दरवर्षीच १६ आॅगस्ट व २६ जानेवारीला असा प्रकार घडतो. परंतु पोलीस या युवकांविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नसल्याने सामान्यांमध्ये मात्र कमालिचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे राष्ट्रीय सणाला गालबोट लागत आहे. मंगळवारी पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनी असाच विभित्स प्रकार चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर पहावयास मिळाला. चंद्रपूर नागपूर मार्ग, पठाणपुरा परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरून जाणारा मार्ग, जिल्हा स्टेडिअम मार्गावर सकाळी ८.३० वाजतापासून या युवकांचा राडा सुरू झाला. २५ ते ३० संख्येने मोटारसायकलवर असलेले हे युवक भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून वाह्यातपणाचे प्रदर्शन करीत होते. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कुणी हटकल्यास त्यांना अश्लिल भाषेत शिविगाळ केली जात होती. यात तरूणीही मागे नव्हत्या. युवकांच्या मोटारसायकलवर बसलेल्या या तरूणीदेखील युवकांना यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले. १६ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. यानिमित्त सर्वत्र देशभक्तीचे वातावरण असते. ज्या शहरात राज्याचे एक मंत्री आणि एक केंद्रिय राज्यमंत्री आहेत, त्यांच्याच शहरात राष्ट्रीय सणाच्या दिवशी उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार होऊनही पोलीस यंत्रणा मात्र हतबल असलेली दिसली. (प्रतिनिधी)कुठे गेली पोलिसांची सतर्कता ?गुन्ह्यांवर आळा बसावा, गुन्हा घडला तर गुन्हेगार सापडावेत, या हेतून चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. अलिकडील काळात घडणाऱ्या दहतवादी हल्ल्याच्या घटना लक्षात घेता १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना असतात. असे असताना शहरात काही युवक उच्छाद घालतात आणि पोलीस त्यांना आवरू शकत नाहीत, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये खेद व्यक्त होत आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग तरी काय ?राष्ट्रीय सणाच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यांवर काही विकृत युवक अशा पद्धतीने धुडगूस घालतात. हा प्रकार निश्चितपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या युवकांना आवर घालायचा असेल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून या युवकांविरुद्ध कारवाई करावी, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे. २६ जानेवारीला असा प्रकार सुरू असल्याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. लगेच आम्ही वाहतूक पोलिसांनी तेथे पाठविले. परंतु त्यापूर्वीच युवकांचे टोळके तेथून पसार झाले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. निश्चितपणे कारवाई केली जाईल. -अशोक कोळी, वाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर.