शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

झाडीपट्टी नाटकांमधील ५० कोटीची उलाढाल थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST

गूड बाय २०२० फोटो रवी जवळे/ घनश्याम नवघडे चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक कुटुंब निर्भर आहे. हिवाळ्यातील सतत चार-पाच ...

गूड बाय २०२०

फोटो

रवी जवळे/ घनश्याम नवघडे

चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक कुटुंब निर्भर आहे. हिवाळ्यातील सतत चार-पाच महिने ही रंगभूमी लोकांचे करमणूक करीत असते. कलागुणांची मुक्त उधळण करणाºया या रंगभूमी आणि त्यातील कलावंतांसाठी २०२० हे वर्ष ‘काळे वर्ष’ ठरले. कोरोना संसर्गामुळे या रंगभूमी व त्यातील नाटकांच्या सादरीकरणावर अनेक मर्यादा आल्या. त्यामुळे नाटके सादर होऊ शकली नाही. या माध्यमातून होणारी ५० कोटींची उलाढाल यंदा थांबली.

कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगांवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाटकांवर एकप्रकारे बंदीच आहे. यामुळे कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यासमोरही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाटक हा कलाप्रकार झाटीपट्टीचा अविभाज्य घटक झाला आहे.''''ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही'''' ही म्हण गेल्या काही वर्षात झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सिझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. या कालावधीत झाडीपट्टीत समावेश असलेल्या चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील प्रत्येक गावात नाटकांचे आयोजन होत असते. काही काही गावात तर दोन दोन नाटकांचे आयोजन होत असते. आता तर नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर झाडीपट्टी रंगभूमीने आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यातही आपले अस्तित्व दाखवण्यास सुरूवात केली आहे.

दिवसेंदिवस झाडीपट्टी रंगभूमी आणखी प्रभावी ठरत आहे. चित्रपटगृहांना मिळणार नाही, एवढे प्रेक्षक झाडीपट्टीतील नाटकांना गर्दी करतात. दरवर्षी जवळपास ५० कोटींची उलाढाल या नाटकांमधून होते. मात्र २०२० हे वर्ष या रंगभूमीसाठी एक दु:खद स्वप्न ठरले. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने नाटकांच्या सादरीकरणावर अनेक नियम घालून दिले आहेत. नियमांची पूर्तता करून नाटक सादर करणे शक्य नाही आणि आयोजनकर्त्यांना परवडण्यासारखे नाही. म्हणूनच संपूर्ण झाडीपट्टी रंगभूमी ओस पडली.

बॉक्स

झाडीपट्टीवर हे घटक अवलंबून

झाडीपट्टी रंगभूमीवर विविध भूमिका निभावणाºया निर्माते, कलावंत, वेशभुषाकार, ध्वनी व प्रकाश संयोजक, हार्मोनियम, तबला, क्लाट वादक व इतर संबंधित अनेकांना अर्थप्राप्ती होते, हे सर्वश्रूत आहे. या व्यतिरिक्त अनेक घटक या नाटकांवर अवलंबून आहेत. या घटकांमध्ये नाटक पहायला येणाºया प्रेक्षकांना चणे, फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, चहा, पान विकून आपली उपजिविका चालविणाºया अनेक छोट्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. आता तर नाटक सुरू होण्यापूर्वी नृत्याच्या आयोजनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. या नृत्य संचामध्येही १० ते १२ कलाकारांचा समावेश असतो. २०२० या वर्षात नाटकांचे आयोजच झाले नसल्याने या कलाकारांसमोरही बिकट परिस्थिती उदभवली आहे.

बॉक्स

५५ नाटय कंपन्या आणि २,५०० प्रयोग

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात जवळजवळ ५५ नाटक कंपनी आहेत. एक कंपनी एका नाटय प्रयोगासाठी ५५ ते ६० हजार रुपये शुल्क आकारत असते. भाऊबिजेपासून नाटकांचा हा सिझन सुरू होतो आणि तो होळीपर्यंत चालतो. या कालावधीत जवळजवळ २ हजार ५०० प्रयोग होत असल्याची माहिती आहे.

कोट

नाटकांच्या प्रयोगावर घालण्यात आलेल्या मर्यादा कमी करण्यात याव्या, यासाठी आमच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली व निवेदन दिले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नाटकांवर एकप्रकारे बंदीच असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीसारखी परिस्थिती आहे.

- हिरालाल पेंटर, निर्माता, कलाकार

कोट

बहुतेक सर्वच उपक्रम सुरू झाले आहेत. आठवडी बाजार, लग्न समारंभ, मोर्चे, सभा, बस यात तर भरगच्च गर्दी असते. मग नाटकांवरच बंधने का? नाटक तर मोकळ्या जागेत होत असते आणि कोणी कोठेही बसू शकतात. तरीही नाटकांवर मर्यादा घालण्यात आल्या. नाटकांवर मर्यादा घालण्यात आल्याने चार महिन्यात कमावून १२ महिने प्रपंच चालविणाºया नाट्यकलेशी जुळलेल्या प्रत्येकाची आर्थिक कोंडी झाली आहे.

- ज्ञानेश्वरी कापगते, नाटय कलावंत.

कोट

एका नाटक कंपनीत ३० ते ३५ लोक काम करतात. यात सर्वच प्रकारातील लोक आले. अनेक कलाकार व व्यक्ती नाटकांवरच अवलंबून आहेत. नाटक बंद असल्यामुळे पोटाची खडगी भरण्यासाठी त्यांनी इतर धंदे करण्याचा प्रयत्न केला. पण अनेकांना जमले नाही. अनेकांना प्रतिसाद मिळाला नाही.अशांची अवस्था अतिशय हलाखीची आहे. शासनाने नाटकांवरील मर्यादा हटविण्याची गरज आहे.

- के. आत्माराम, विनोदी कलावंत, झाडीपट्टी रंगभूमी.