शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी नाटकांमधील 50 कोटीची उलाढाल थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगांवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाटकांवर एकप्रकारे बंदीच आहे. यामुळे कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यासमोरही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाटक हा कलाप्रकार झाटीपट्टीचा अविभाज्य घटक झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : मर्यादांमुळे रंगभूमीच हवालदील

रवी जवळे / घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक कुटुंब निर्भर आहेत. हिवाळ्यातील चार-पाच महिने ही रंगभूमी लोकांचे करमणूक करीत असते. कलागुणांची मुक्त उधळण करणाऱ्या या रंगभूमी आणि त्यातील कलावंतांसाठी २०२० हे वर्ष ह्यकाळे वर्षह्ण ठरले. कोरोना संसर्गामुळे या रंगभूमी व त्यातील नाटकांच्या सादरीकरणावर अनेक मर्यादा आल्या. त्यामुळे नाटके सादर होऊ शकली नाही. या माध्यमातून होणारी ५० कोटींची उलाढाल यंदा थांबली.कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगांवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाटकांवर एकप्रकारे बंदीच आहे. यामुळे कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यासमोरही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाटक हा कलाप्रकार झाटीपट्टीचा अविभाज्य घटक झाला आहे. ह्णज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाहीह्ण ही म्हण गेल्या काही वर्षात झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सिझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. या कालावधीत झाडीपट्टीत समावेश असलेल्या चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील प्रत्येक गावात नाटकांचे आयोजन होत असते. काही काही गावात तर दोन दोन नाटकांचे आयोजन होत असते. आता तर नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर झाडीपट्टी रंगभूमीने आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यातही आपले अस्तित्व दाखवण्यास सुरूवात केली आहे.दिवसेंदिवस झाडीपट्टी रंगभूमी आणखी प्रभावी ठरत आहे. चित्रपटगृहांना मिळणार नाही, एवढे प्रेक्षक झाडीपट्टीतील नाटकांना गर्दी करतात. दरवर्षी जवळपास ५० कोटींची उलाढाल या नाटकांमधून होते. मात्र २०२० हे वर्ष या रंगभूमीसाठी एक दु:खद स्वप्न ठरले.कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने नाटकांच्या सादरीकरणावर अनेक नियम घालून दिले आहेत. नियमांची पूर्तता करून नाटक सादर करणे शक्य नाही आणि आयोजनकर्त्यांना परवडण्यासारखे नाही. म्हणूनच संपूर्ण झाडीपट्टी रंगभूमी ओस पडली.झाडीपट्टीवर हे घटक अवलंबूनझाडीपट्टी रंगभूमीवर विविध भूमिका निभावणाऱ्या निर्माते, कलावंत, वेशभुषाकार, ध्वनी व प्रकाश संयोजक, हार्मोनियम, तबला, क्लाट वादक व इतर संबंधित अनेकांना अर्थप्राप्ती होते, हे सर्वश्रूत आहे. या व्यतिरिक्त अनेक घटक या नाटकांवर अवलंबून आहेत. या घटकांमध्ये नाटक पहायला येणाºया प्रेक्षकांना चणे, फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, चहा, पान विकून आपली उपजिविका चालविणाºया अनेक छोट्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. आता तर नाटक सुरू होण्यापूर्वी नृत्याच्या आयोजनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. या नृत्य संचामध्येही १० ते १२ कलाकारांचा समावेश असतो. २०२० या वर्षात नाटकांचे आयोजच झाले नसल्याने या कलाकारांसमोरही बिकट परिस्थिती उदभवली आहे.